Syed Mushtaq Ali Trophy 2021 | बडोद्याचा धमा’केदार’ विजय, महाराष्ट्रावर 60 धावांनी मात

केदारने 71 चेंडूत 11 फोर आणि 4 सिक्ससह शानदार नाबाद 99 धावा चोपल्या.

Syed Mushtaq Ali Trophy 2021  | बडोद्याचा धमा'केदार' विजय, महाराष्ट्रावर 60 धावांनी मात
केदारची शानदार खेळी
Follow us
| Updated on: Jan 16, 2021 | 6:57 PM

बडोदा : सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत (Syed Mushtaq Ali Trophy 2021) महाराष्ट्र विरुद्ध बडोदा (Baroda vs Maharashtra) यांच्यात सामना खेळण्यात आला. या सामन्यात केदार देवधरच्या (Kedar Devdhar) शानदार 99 धावांच्या जोरावर बडोद्याने महाराष्ट्रावर 60 धावांनी शानदार विजय मिळवला. बडोद्याने महाराष्ट्राला विजयासाठी 159 धावांचे आव्हान दिले होते. मात्र महाराष्ट्राच्या फंलदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. बडोद्याच्या गोलंदाजांसमोर महाराष्ट्राराच्या फलंदाजांनी शरणागती पत्कारली. महाराष्ट्र 98 धावांवर ऑल आऊट झाला. महाराष्ट्राकडून नौशाद खानने सर्वाधिक 32 धावांची खेळी केली. तर केदार जाधवने 25 धावा केल्या. तर बडोद्याकडून अतित शेठने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर निनाद रथवाने 3 विकेट्स घेतल्या.  ( syed mushtaq ali trophy 2021 kedar devdhar scored 99 runs baroda beat maharashatra by 60 runs)

विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या महाराष्ट्राची निराशाजनक सुरुवात राहिली. महाराष्ट्राने 2 धावांवर 2 विकेट्स गमावल्या. त्यामुळे महाराष्ट्र अडचणीत सापडली. मात्र यानंतर नौशाद शेख आणि केदार जाधवने तिसऱ्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी केली. मात्र यानंतर महाराष्ट्राने एकामागोमाग एक ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. महाराष्ट्राच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. केदार जाधव, नौशाद शेख आणि तजिंदर सिंहचा अपवाद वगळता महाराष्ट्राच्या इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.

बडोद्याकडून अतित शेठने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर निनाद रथवाने 3 विकेट्स घेतल्या. तर लुकमन मेरीवालाने 2 खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला.

त्याआधी महाराष्ट्राने टॉस जिंकून बडोद्याला बॅटिंगसाठी भाग पाडले. केदार देवधर आणि स्मिथ पटेल या सलामी जोडीने बडोद्याला आश्वासक सुरुवात दिली. या जोडीने 42 धावा जोडल्या. यानंतर पटेल 12 धावांवर बाद झाला. यानंतर विष्णू सोलंकी मैदानात आल्या.

केदारने विष्णूसह चांगली भागीदारी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 63 धावा जोडल्या. यादरम्यान केदारने आपले अर्धशतक पूर्ण केलं. यानंतर विष्णू 28 धावांवर बाद झाला. यानंतर नव्या ओव्हरच्या पुढील चेंडूवर बडोद्याने विकेट गमावली. निनाद रथवा शून्यावर बाद झाला. मात्र केदारने एक बाजू लावून धरली होती. फलंदाजांना सोबतीने केदारने महाराष्ट्राच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.

केदारने 71 चेंडूत 11 फोर आणि 4 सिक्ससह शानदार नाबाद 99 धावा केल्या. केदारचे शतक अवघ्या 1 धावेने राहिले. मात्र यानंतरही केदारने एक विक्रम केला आहे. केदार सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत 2 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. या स्पर्धेत अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे.

संबंधित बातम्या :

Syed Mushtaq Ali T20 Trophy| ज्युनिअर अझरुद्दीनचा झंझावात, 11 सिक्स, 9 फोर, क्रिकेट बोर्डाकडून मोठा सन्मान

(syed mushtaq ali trophy 2021 kedar devdhar scored 99 runs baroda beat maharashatra by 60 runs)

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.