
आयसीसी टी-20 वर्ल्ड कपच्या थराराला आता सुरूवात झाली आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये हा वर्ल्ड कप सुरू असून आता हळूहळू स्पर्धेला रंग चढत असलेला पाहायला मिळत आहे. वर्ल्ड कप सुरू असताना वर्ल्ड कप विनर टीमच्या कॅप्टनने अमेरिकेसोबत मोठी डील केल्याची माहिती सजमत आहे. ही डील म्हणजे कॅप्टन अमेरिकेमध्ये खेळणार असून त्यासंदर्भातील बोलणीही झाली आहे. कोण आहे तो कॅप्टन ज्याने ही डील केली आहे.
वर्ल्ड कप स्पर्धा झाल्यानंतर अमिरिकेमधील मेजर क्रिकेट लीग सुरू होणार आहे. जुलै महिन्यामध्ये सुरू होणाऱ्या या लीगमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा कॅप्टन पॅट कमिन्स याने या लीगमध्ये खेळण्यासाठी होकार दिल्याचं समजत आहे. आयसीसीने अलीकडेच या क्रिकेट लीगला लिस्ट ए दर्जा दिला आहे.
कमिन्स सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स या संघाकडून खेळणार असल्याचं बोललं जात आहे. आताच भारतामध्ये पार पडलेल्या आयपीएलमध्ये पॅट कमिन्सने आपल्या नेतृत्त्वात टीमला फायनल गाठून दिली होती. मात्र फायनल सामन्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून पराभव झाला होता. माजी कर्णधार ॲरॉन फिंच याची जागी रिकामी झाली आहे. त्याच्या जागी कमिन्स फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स संघाकडून खेळणार आहे.
मेजर क्रिकेट लीग ही अमेरिकेची पहिली व्यावसायिक टी-२० चॅम्पियनशिप आहे. या लीगमध्ये पहिल्या सत्रामध्ये एकूण सहा संघ होते. त्यातील तीन संघ हे आयपीएलच्या फ्रँचायसींनी विकत घेतले आहेत. MI न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस नाइट रायडर्स आणि टेक्सास सुपर किंग्स अशी या संघांची नावे आहेत.
पॅट कमिन्स याने कॅप्टन म्हणून चांगलं यश मिळवलं आहे. कारण कमिन्सने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप, वन डे वर्ल्ड कप या ट्रॉफी आपल्या नेतृत्त्वात मिळवून दिल्या आहेत. आयपीएलमधील दुसरा सर्वाधिक महागडा ठरलेल्या कमिन्सनेही दमदार कामगिरी करत टीमला फायनलपर्यंत पोहोचवलं होतं.