
मुंबई: क्रिकेट मध्ये आतापर्यंत अनेकदा शेवटच्या षटकात रोमांचक खेळ पहायला मिळाला आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत उत्कंठा ताणली गेल्याचं आपण पाहिलं आहे. T 20 Blast स्पर्धेत एका सामन्यात शेवटच षटक खूपच उत्कंठावर्धक ठरलं. शेवटच्या षटकात 6 चेंडूत जिंकण्यासाठी 5 धावा आणि 5 विकेट हातात असतील, अशा स्थितीत फलंदाजी करणारा संघ हरु शकतो का? असं घडू शकतं, पण अपवादाने. तो अपवाद T 20 Blast स्पर्धेतील या सामन्यात घडला. क्रिकेट हा किती अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, हे यातून स्पष्ट होतं. टी 20 ब्लास्ट स्पर्धेत यॉर्कशायर आणि सरे (Yorkshire vs Surrey) या दोन टीम्स मध्ये क्वार्टर फायनलचा (Quarter final) पहिला सामना झाला. यॉर्करशायरच्या संघाने शेवटच्या षटकात 5 धावांचा बचाव करुन 1 रन्सने मॅच जिंकली. यॉर्कशायरच्या विजयात शेवटचं षटक टाकणाऱ्या त्या गोलंदाजाने महत्त्वाची भूमिका बजावली. जॉर्डन थॉम्पसन त्या गोलंदाजाच नाव आहे. सरेकडे पाच फलंदाज शिल्लक असतानाही, त्याने सरेला पाच धावा करु दिल्या नाहीत. आपल्या झुंजार खेळाने त्याने एक अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला.
शेवटच्या षटकात काय घडलं? ते आता जाणून घेऊया. विजयासाठी 6 चेंडूत 5 धावांची आवश्यकता होती. यॉर्कशायरने जॉर्डन थॉम्पसनच्या हाती चेंडू सोपवला. समोर जॅमी ओवर्ट्न फलंदाजी करत होता. थॉम्पसनने पहिला चेंडू डॉट टाकला. त्यानंतर दुसऱ्याचेंडूवर 1 धाव दिली. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर सुद्धा एक रन्स दिला.
आता शेवटच्या 3 चेंडूंवर सरेला 3 धावांची आवश्यकता होती. पण चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर विकेट पडली. जॅमी ओवर्ट्न रन आऊट झाला. त्यानंतर सुनील नरेनला थॉम्पसनने बाद केलं. सरेला आता शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 3 धावांची गरज होती. पण या चेंडूवर सरेचा संघ फक्त 1 रन्स करु शकला.
यॉर्कशायरने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात पाच बाद 160 धावा केल्या. विजयासाठी 161 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या सरेच्या टीमने 20 षटकात 7 विकेट गमावून 159 धावा केल्या. यॉर्कशायरने टी 20 ब्लास्ट स्पर्धेतील पहिली क्वार्टर फायनल जिंकली.