T20 WC, Ind Vs Pak : पाकविरुद्ध कशी असेल भारताची प्लेईंग-11, हार्दिक पंड्याला खेळवणार का? विराट कोहली म्हणाला…

| Updated on: Oct 23, 2021 | 4:36 PM

भारतीय संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेत उद्यापासून (रविवार) आपली मोहिम सुरु करणार आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय संघ आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करणार आहे.

T20 WC, Ind Vs Pak : पाकविरुद्ध कशी असेल भारताची प्लेईंग-11, हार्दिक पंड्याला खेळवणार का? विराट कोहली म्हणाला...
Virat Kohli - Hardik Pandya
Follow us on

मुंबई : भारतीय संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेत उद्यापासून (रविवार) आपली मोहिम सुरु करणार आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय संघ आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करणार आहे. भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही देशांमध्ये वातावरणनिर्मिती सुरु आहे. दोन्ही देशांचे अनेक माजी खेळाडू आणि क्रीडा समीक्षक या सामन्याबद्दल आपापली मतं व्यक्त करत आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया कशी असेल? टीम कॉम्बिनेशन कसं असेल? कॅप्टन कोहली कोणत्या प्लेइंग इलेव्हनसोबत मैदानात उतरेल? हार्दिक पांड्या खेळणार की नाही? अशा अनेक प्रश्नांवर सध्या क्रिकेटविश्वात चर्चा सुरु आहेत. दरम्यान, यापैकी काही प्रश्नांची उत्तरं आज भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिली आहेत. त्याने आज पत्रकारांशी संवाद साधला. (T20 World Cup 2021, Ind Vs Pak : India Playing 11 against Pakistan, Will Hardik Pandya play? Virat Kohli answers every question)

विराट म्हणाला की, आम्ही गेल्या काही दिवसांपासून आयपीएलच्या निमित्ताने टी-20 क्रिकेट खेळत आहोत. आम्ही पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी तयार आहोत. टीममधील सर्व खेळाडूंना त्यांच्या जबाबदारीची जाणीव आहे. त्यामुळे आम्ही पाकिस्तानविरुद्ध सामन्यामध्ये चांगला खेळ करु. विराटला यावेळी त्याच्या कर्णधारपदावरुन काही प्रश्न विचारण्यात आले, यावर तो म्हणाला की, कर्णधारपदाबद्दल मी यापूर्वी अनेकदा बोललो आहे.

हार्दिक पंड्या पूर्णपणे फिट

दरम्यान, विराटने हार्दिक पांड्याविषयीच्या अनेक प्रश्नांवर उत्तरं दिली. तो म्हणाला की, पंड्याची प्रकृती सध्या चांगली असून तो मॅचमध्ये दोन षटकं गोलंदाजी करु शकतो, अशी त्याची स्थिती आहे. हार्दिक पंड्या त्याच्या पूर्ण क्षमतेनं खेळतो त्यावेळी त्यानं सर्वोतकृष्ट खेळ केलेला आहे. तो फिट असल्याचे विराटनं सांगितले. तसेच पाकिस्तानविरुद्धच्या प्लेईंग इलेव्हनची घोषणा आज होणार नसल्याचे विराट कोहलीने सांगितले आहे.

पाकिस्तानचा संघ मजबूत

दरम्यान, एका पाकिस्तानी पत्रकाराने विराटला भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या सामन्यांबाबत विचारले असता विराट म्हणाला की, “आम्ही पाकिस्तान विरोधात यापूर्वी काय खेळ केला, आम्ही त्यांना किती वेळा पराभूत केलंय, याचा आम्ही विचार केला नाही. आमचं लक्ष त्या दिवशीच्या खेळावर आहे. त्या मॅचची आम्ही चांगली तयारी करतो. पाकिस्तान ही चांगली टीम असून त्यांच्या विरोधात चांगली तयारी करुन खेळावं लागतं. आमचं लक्ष कामगिरीत सातत्य ठेवण्यावर असेल. पाकिस्तानची टीम मबबूत आहे. त्यांच्याकडे अनेक गेमचेंजर खेळाडू आहेत, जे कोणत्याही क्षणी मॅच पलटू शकतात.”

भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

इतर बातम्या

T20 WC, Ind Vs Pak : पाकिस्तानची टीम मजबूत, त्यांच्याकडेही गेमचेंजर, PAK पत्रकाराच्या प्रश्नावर विराट कोहलीचं उत्तर

Virat Kohli Press : पाकिस्तानविरुद्धची मॅच जिंकण्यावर आमचं लक्ष, टीम इंडिया विजयासाठी सज्ज

T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मिस्ट्री स्पिनरला संधी नाही, दिग्गज सिलेक्टरने सांगितली प्लेइंग XI

(T20 World Cup 2021, Ind Vs Pak : India Playing 11 against Pakistan, Will Hardik Pandya play? Virat Kohli answers every question)