T20 World Cup 2022: अखेर इरफान पठानने KL Rahul बद्दल उपस्थित केलं प्रश्नचिन्ह
T20 World Cup 2022: इरफान पठान नेमकं काय म्हणाला?

एडिलेड: टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कपसाठी जोरदार तयारी केली होती. पण सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा प्रवास संपुष्टात आला. टीम इंडियाच्या वर्ल्ड कपमधील पराभवाला अनेक कारण आहेत, त्यापैकी के.एल.राहुल एक मुख्य मुद्दा आहे. केएल राहुल टी 20 वर्ल्ड कपमध्ये अपयशी ठरला. त्याच्यावर चहूबाजूंनी टीका सुरु आहे. सलामीवीर म्हणून तो टीम इंडियाला दमदार सुरुवात देऊ शकला नाही.
कुठल्या टीमविरुद्ध किती धावा?
बांग्लादेश आणि झिम्बाब्वे या दोन टीम्स विरुद्ध केएल राहुलने जरुर अर्धशतक झळकावलं. पण अन्य टीम्स विरुद्ध 4,9, आणि 9 धावा केल्या. सेमीफायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध तो अवघ्या 5 रन्सवर आऊट झाला.
पावरप्लेमध्ये सहज फलंदाजी नाही
पावरप्लेमध्ये फलंदाजी करताना केएल राहुल सहज वाटला नाही. त्याला झटपट धावा जमवता आल्या नाहीत. पावरप्लेमध्ये टीम इंडियाने 40 किंवा त्यापेक्षा जास्त धावा फक्त एकदाच केल्या असतील.
हाफ सेंच्युरीला महत्त्व का नाही?
टीम इंडियाचा माजी खेळाडू इरफान पठानने केएल राहुलच्या परफॉर्मन्सवर भाष्य केलय. “राहुलच्या दोन्ही हाफसेंच्युरी छोट्या टीम्स विरोधात आहेत, त्यामुळे त्याला तितकं महत्त्व नाहीय. राहुलने सुरुवात खराब केली. त्यानंतर त्याने दोन हाफ सेंच्युरी झळकावल्या. धावांची गरज असताना त्याने अर्धशतक झळकावली हे खरं आहे” असं इरफान म्हणाला. तो स्टार स्पोर्ट्सवरील कार्यक्रमात बोलत होता.
त्याची कामगिरी ढासळायची
“स्वत:ला पाठिंबा देण्यासाठी राहुलकडे आत्मविश्वास नाहीय. त्यामुळे त्याची कामगिरी ढासळायची” असं इरफान पठान म्हणाला. मोठ्या दुखापतीनंतर झिम्बाब्वे विरुद्ध वनडे सीरीजमध्ये त्याने टीममध्ये कमबॅक केलं. तेव्हा सुद्धा कामगिरीत सातत्य ठेवण्यासाठी त्याचा संघर्ष सुरु होता.
स्ट्राइक रेटच काय?
स्ट्राइक रेटच्या मुद्याकडेही इरफान पठानने लक्ष वेधलं. “त्याला फलंदाजी करताना पाहतो, तेव्हा तो टेक्निकली खूप उत्तम वाटतो. पण मानसिक कणखरतेचा विषय येतो, तिथे त्याच्यात आत्मविश्वास दिसत नाही. त्याच्या स्ट्राइक रेटबद्दल आपण आधी सुद्धा बोललोय” असं इरफान म्हणाला.
