T20 World cup: न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये, भारताला झिम्बाब्वे विरुद्ध विजय आवश्यक, जाणून घ्या का?
T20 World cup: न्यूझीलंडची टीम ग्रुप 1 मधून सेमीफायनलमध्ये पोहोचलीय. टीम इंडिया ग्रुप 2 मध्ये आहे, मग टीम इंडियाला झिम्बाब्वे विरुद्ध विजय मिळवणं का आवश्यक आहे? यामागे काय कारण आहे? ते जाणून घ्या.

एडिलेड: न्यूझीलंडच्या टीमने T20 World Cup 2022 मध्ये सर्वोत्तम प्रदर्शन केलय. टुर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारी न्यूझीलंड पहिली टीम ठरली आहे. एडिलेडच्या मैदानात हा सामना झाला. आयर्लंडला हरवून न्यूझीलंडच्या टीमने सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. किवी टीमच्या कॅप्टनने त्यांच्या विजयाची स्क्रिप्ट लिहीली.
म्हणून टीम इंडियाला जिंकाव लागेल
विलियमसनने अर्धशतक फटकावून 35 चेंडूत 61 धावा फटकावल्या. न्यूझीलंडच्या विजयानंतर टीम इंडियासाठी आता झिम्बाब्वे विरुद्ध विजय मिळवणं आवश्यक बनलय. तुम्ही म्हणालं, न्यूझीलंडची टीम ग्रुप 1 मधून सेमीफायनलमध्ये पोहोचलीय. टीम इंडिया ग्रुप 2 मध्ये आहे, मग टीम इंडियाला झिम्बाब्वे विरुद्ध विजय मिळवणं का आवश्यक आहे? यामागे काय कारण आहे? ते जाणून घ्या.
टीम इंडियावर भारी पडते न्यूझीलंडची टीम
आयसीसी टुर्नामेंट्समध्ये न्यूझीलंडची टीम नेहमीच टीम इंडियावर भारी पडलीय. 2019 वनडे वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये हरवलं होतं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिपच्या फायनलमध्येही न्यूझीलंडच्या टीमने भारताला पराभूत केलं होतं. 2016 टी वर्ल्ड कपमध्येही न्यूझीलंडने भारताला हरवलं होतं. 2007 टी 20 वर्ल्ड कपमध्येही भारताने न्यूझीलंड विरुद्ध सामना गमावला होता.
न्यूझीलंडला कसं टाळता येईल?
भारताला न्यूझीलंड विरुद्ध लढत टाळायची असेल, तर झिम्बाब्वे विरुद्धचा सामना जिंकून टेबलमध्ये टॉपवर रहाव लागेल. टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या नियमानुसार, सेमीफायनलमध्ये ग्रुप 1 च्या टॉपर टीमचा ग्रुप 2 च्या दुसऱ्या नंबरच्या टीमशी सामना होईल. न्यूझीलंड आपल्या ग्रुपमध्ये नंबर 1 आहे, अशा स्थितीत ग्रुप 2 च्या दुसऱ्या नंबरच्या टीमला भिडेल.
‘हे’ दोन तुलनेने सोपे प्रतिस्पर्धी
टीम इंडिया ग्रुप 2 मध्ये टॉपवर राहिली, तर त्यांचा सामना ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड यांच्यापैकी एकाशी होईल. नॉकआऊट सामन्यात टीम इंडियासाठी न्यूझीलंडऐवजी ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड जास्त सोपे प्रतिस्पर्धी ठरतील. या दोन टीम्स विरोधात भारताची कामगिरी चांगली राहिली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला वॉर्मअप मॅचमध्ये हरवलं होतं. इंग्लंड विरुद्ध त्यांच्याच देशात टी 20 मालिका जिंकली आहे.
