IND vs PAK: दिसणार नव्हतीस ना, मग आता…पाकिस्तानी अभिनेत्रीने मारली पलटी
IND vs PAK: कोण आहे ती अभिनेत्री? तिने भारत-पाक मॅच आधी काय म्हटलं होतं?

लाहोर: भारत-पाकिस्तान सामन्याचा जोश नेहमी दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्येही पहायला मिळतो. या मॅचचा निकाल फक्त मैदानापुरता मर्यादीत राहत नाही. त्याचे पडसाद सोशल मीडियावरही उमटतात. दोन्ही बाजूचे फॅन्स जय-पराजयानंतर सोशल मीडियावर तुटून पडतात. परस्परांना प्रश्न, उत्तर, आरोप-प्रत्यारोप असा सामना या चाहत्यांमध्ये रंगतो. टीम इंडियाने मेलबर्नमध्ये रविवारी पाकिस्तानवर विजय मिळवला. त्याचे पडसाद अजूनही सोशल मीडियावर उमटत आहेत.
उगाचच काहीतरी बोलून वेळ वाया घालवतेय
पाकिस्तानी अभिनेत्री सहर शिनवारी भारतीय फॅन्सच्या रडारवर आहे. तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातय. भारतीय चाहते सहर शिनवारीकडे तिने तिचं टि्वटर अकाऊंड डिलीट करावं, अशी मागणी करतायत. सहर शिनवारी दिलेला शब्द पूर्ण करण्याऐवजी उगाचच काहीतरी बोलून वेळ वाया घालवतेय.
पाकिस्तानी चाहत्यांचा विश्वास मोडला
मागच्यावर्षी UAE मध्ये टी 20 वर्ल्ड कप झाला. त्यावेळी पाकिस्तानने भारतावर 10 विकेटने विजय मिळवला होता. यावेळी सुद्धा बाबर आजमची टीम अशीच कमाल करेल, असं पाकिस्तानी चाहत्यांना वाटत होतं. पण असं घडलं नाही. टीम इंडियाने या मॅचमध्ये अखेरच्या चेंडूवर चार विकेटने विजय मिळवला.
मॅचआधी काय टि्वट केलं होतं?
मॅच सुरु होण्याआधी पाकिस्तानी अभिनेत्री सहर शिनवारीने एक टि्वट केलं होतं. टीम इंडियाने मॅच जिंकली, तर मी माझं टि्वटर अकाऊंट डिलीट करेन. पुन्हा कधी दिसणार नाही, असं तिने टि्वटमध्ये म्हटलं होतं. टीम इंडियाच्या विजयानंतर भारतीय फॅन्स तिला तिच्या शब्दांची आठवण करुन देतायत. सहरला ट्रोल केलं जातय.
If India wins today, I’ll delete Twitter forever and never come back
— Sehar Shinwari (@SeharShinwari) October 23, 2022
वाटेल ती बडबड करतेय
सहर शिनवारी दिलेला शब्द पाळण्याऐवजी टि्वटरवर वाटेल ती बडबड करतेय. या मॅचमध्ये रोहित शर्माने टॉस जिंकून पाकिस्तानला पहिली बॅटिंग दिली. पाकिस्तानच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट गमावून 159 धावा केल्या. टीम इंडियाने 20 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर लक्ष्य गाठून एक रोमांचक विजय मिळवला. विराट कोहली नाबाद 82 धावा करुन विजयाचा हिरो ठरला.