AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! ...हे आमचं दुर्दैवच, संजय शिरसाटांच्या विधानाने खळबळ

मोठी बातमी! …हे आमचं दुर्दैवच, संजय शिरसाटांच्या विधानाने खळबळ

| Updated on: Jun 03, 2026 | 5:27 PM
Share

राज्यात सगळीकडे विधान परिषदेचीच चर्चा सुरू आहे, अशात महायुतीमध्ये नेत्यांची रूसवा-रुसवी सुरू असल्याचंही सांगितलं जात आहे. यावेळी विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुका होत असून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना रंगला आहे.

राज्यात सगळीकडे विधान परिषदेचीच चर्चा सुरू आहे, अशात महायुतीमध्ये नेत्यांची रूसवा-रुसवी सुरू असल्याचंही सांगितलं जात आहे. यावेळी विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुका होत असून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना रंगला आहे. मात्र, काही मतदारसंघात भाजपच्या महायुतीतील उमेदवारांनी बंडखोरी केल्याने महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची चिंता वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच, संभाजीनगरमधील शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी भाजप या मित्र पक्षाबाबत मोठं विधान केलं होतं, यावर आता संजय शिरसाटांनी मत मांडलं आहे.

सत्तारांच्या या विधानानंतर अनेक दावे-प्रतिदावे झाले. जेव्हा संजय शिरसाटांना याबाबत विचारणा केली, तेव्हा ते म्हणाले, “संभाजीनगरमधील जागा आम्हाला मिळायला हवी होती, मात्र ती मिळाली नाही हे आमचं दुर्दैव आहे.” पुढे शिरसाट म्हणाले, “पालकमंत्र्यांबाबत किंवा पक्षाबाबत नाराजी असते, ती व्यक्त करायला हवी, मात्र त्याला मर्यादा असते. कितपत बोलावं, हे नेत्यांनी समजायला हवं.” एकूणच सत्तारांच्या वक्तव्यावर शिरसाटांनी नाव न घेता थेट निशाणा साधला.

Published on: Jun 03, 2026 05:27 PM

Follow Us
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं.

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा