AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup: ‘टीम इंडिया डरपोकसारखी खेळते’, वर्ल्ड कपआधी इंग्लंडच्या माजी कॅप्टनने डिवचलं

T20 World Cup: असं विधान करुन इंग्लंडच्या माजी कॅप्टनने वादाची ठिणगी टाकली आहे

T20 World Cup: 'टीम इंडिया डरपोकसारखी खेळते', वर्ल्ड कपआधी इंग्लंडच्या माजी कॅप्टनने डिवचलं
Team indiaImage Credit source: PTI
| Updated on: Oct 14, 2022 | 4:43 PM
Share

मुंबई: टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियामध्ये (Team india in Australia) आहे. लवकरच तिथे टी 20 वर्ल्ड कप (T20 World cup) स्पर्धा सुरु होणार आहे. टीम इंडियाचे सध्या सराव सामने सुरु आहेत. वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. ही मॅच मेलबर्न येथे होईल. या मॅचआधी इंग्लंडचा माजी कॅप्टन नासिर हुसैन (nasser hussain) याने टीम इंडियाबद्दल एक वादग्रस्त विधान केलय.

त्यामुळेच त्यांच सर्वात जास्त नुकसान

नासिर हुसैनच्या मते, “टीम इंडियाकडे चांगले खेळाडू आहेत. त्यांनी अनेक द्विपक्षीय मालिका जिंकल्या आहेत. पण वर्ल्ड कपसारख्या आयसीसी टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाचा डरपोकपणा दिसून येतो. टीम इंडिया डरपोक सारखी खेळते. त्यामुळेच त्यांच सर्वात जास्त नुकसान होतं”

आशिया कपमध्ये निराशा

मागच्या काही वर्षात टीम इंडियाने चांगलं क्रिकेट खेळलय. खासकरुन 2022 मध्ये. पण अलीकडेच झालेल्या आशिया कपमध्ये टीम इंडियाने निराशाजनक प्रदर्शन केलं. टीम इंडिया फायनलपर्यंत पोहोचली नाही. श्रीलंकेने पाकिस्तानला हरवून आशिया कपच जेतेपद मिळवलं.

हे सुद्धा सत्य

“ICC इवेंटसमध्ये टीम इंडियाच्या कामगिरीबद्दल काही मुद्दे आहेत. त्यांच्याकडे चांगले खेळाडू आहेत. त्यांना ते रोटेट करतात. आराम देतात. टीम इंडियाने सर्वच टीम्सना हरवलं आहे. पण वर्ल्ड इवेंट म्हणजे मोठ्या स्पर्धेत ते डरपोकसारखा गेम खेळतात, हे सुद्धा सत्य आहे” असं नासिर हुसैन स्काय स्पोर्ट्सवर म्हणाला.

पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध

मागच्यावर्षी झालेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच ग्रुप स्टेजमध्येच आव्हान संपुष्टात आलं होतं. टीम इंडियाने 1983 साली वर्ल्ड कप, त्यानंतर 2007 मध्ये टी 20 आणि 2011 मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकलाय. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा जिंकली आहे. पुढच्या आठवड्यापासून टी 20 वर्ल्ड कप सुरु होतोय. टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध 23 ऑक्ंटोबरला होणार आहे.

Follow Us
11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद; तर बारावीचा निकाल आज दुपारी....
11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद; तर बारावीचा निकाल आज दुपारी.....
सर्वसामान्यांना महागाईची झळ; गॅसनंतर आता पेट्रोल-डिझेलही महागणार?
सर्वसामान्यांना महागाईची झळ; गॅसनंतर आता पेट्रोल-डिझेलही महागणार?.
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला.
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?.
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....