T20 World Cup : सलग दोन सामन्यात पराभव होऊनही अमेरिका पोहोचणार उपांत्य फेरीत! असं कसं होणार ते जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील सामने रंगतदार वळणावर आले आहेत. अजूनही उपांत्य फेरीचं गणित काही सुटलेलं नाही. मात्र संधी अजूनही सर्वांना आहे. असं असताना गट 2 मधील उपांत्य फेरीचं गणित खूपच किचकट झालं आहे. या गटात दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि अमेरिका हे संघ आहेत. या गटातून अमेरिकेलाही उपांत्य फेरीची संधी आहे.

T20 World Cup : सलग दोन सामन्यात पराभव होऊनही अमेरिका पोहोचणार उपांत्य फेरीत! असं कसं होणार ते जाणून घ्या
| Updated on: Jun 22, 2024 | 6:19 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील गट 2 मध्ये अमेरिका, दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड हे संघ आहे. या गटातून प्रत्येक संघाचे दोन-दोन सामने झाले आहेत. दक्षिण अफ्रिकेने दोन पैकी दौन सामने जिंकत या गटात अव्वल स्थान गाठलं आहे. मात्र अजूनही उपांत्य फेरीचं गणित सुटलेलं नाही. वेस्ट इंडिज आणि इंग्लंडला शेवटचा सामना जिंकला तर संधी मिळेल. कारण या दोन्ही संघांनी दोन पैकी एक सामना जिंकलेला आहे आणि शेवटच्या सामन्यात विजय मिळवला तर नेट रनरेटच्या आधारावर गणित सुटू शकतं. पण या पलीकडे विचार करायचा झाला तर अमेरिकेला सलग दोन सामन्यात पराभूत होऊनही संधी आहे. असं कसं शक्य आहे असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. पण गणिती भाषेत सांगायचं तरी दक्षिण अफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज इतकीच संधी अमेरिकेलाही आहे. त्यासाठी एक विचित्र गणित सुटणं गरजेचं आहे. हे समीकरण कसं आहे ते आपण जाणून घेऊयात

या गटातून शेवटचा सामना दक्षिण अफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज आणि अमेरिका विरुद्ध इंग्लंड यांच्यात होत आहे. अमेरिकेच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर दक्षिण अफ्रिकेने वेस्ट इंडिजला मोठ्या फरकाने पराभूत करणं गरजेचं आहे. यामुळे वेस्ट इंडिजचे दोनच गुण राहतील. तसेच नेट रनरेटवर फटका बसेल आणि क्रमवारी ढासळेल. दुसरीकडे, अमेरिकेने इंग्लंडला मोठ्या फरकाने पराभूत केलं पाहीजे. यामुळे अमेरिकेचे दोन गुण होतील तसेच नेट रनरेटमध्ये मोठा फरक पडेल.

वरचं समीकरण पाहता, दक्षिण अफ्रिका तीन पैकी तीन सामने जिंकून उपांत्य फेरी गाठेल. तर अमेरिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजचे प्रत्येकी दोन गुण राहतील. अशात नेट रनरेटच्या आधारावर दुसरा संघ उपांत्य फेरी गाठेल. जर अमेरिकेने या समीकरणात नेट रनरेटमध्ये बाजी मारली तर नक्कीच उपांत्य फेरी गाठेल. तसं पाहिलं क्रीडाप्रेमींच्या मते, हे गणित काही सुटणारं नाही. पण कधी काय होईल सांगताही येत नाही. कारण या स्पर्धेत आधीच मोठे उलटफेर पाहायला मिळाले आहेत.

युनायटेड स्टेट्स संघ: स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस (विकेटकीपर), नितीश कुमार, आरोन जोन्स (कर्णधार), कोरी अँडरसन, शायन जहांगीर, हरमीत सिंग, जसदीप सिंग, नॉथुश केंजिगे, अली खान, सौरभ नेत्रावलकर, मोनांक पटेल, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, शेडली व्हॅन शाल्क्विक