
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वात मोठा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत आहे. या सामन्यात पाकिस्तानला विजय खूपच महत्त्वाचा आहे. दुसरीकडे भारताने हा सामना गमावला तर पुढचं गणित खूपच किचकट होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी इकडे आड आणि तिकडे विहीर अशी स्थिती आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने आपला आत्मविश्वास दाखवून दिला. इतकंच काय तर अमेरिकेने पराभूत केल्यानंतरही भारत पाकिस्तान सामन्यासाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं. त्यामुळे हा सामना अतितटीचा होईल की एका बाजूने झुकलेला राहील हे लवकरच स्पष्ट होईल. बाबर आझमने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर सांगितलं की, “हवामान आणि खेळपट्टीतील आर्द्रता यामुळे आम्ही प्रथम गोलंदाजी करू. परिस्थिती आम्हाला अनुकूल आहे, आमच्याकडे चार वेगवान गोलंदाज आहेत. आम्ही त्यांच्या परिस्थितीनुसार वापर करण्याचा प्रयत्न करू. भूतकाळ हा भूतकाळ आहे, आम्ही आजच्या सामन्याची वाट पाहत आहोत, आम्ही तयार आहोत आणि आमचे 100% देऊ. नेहमीच मोठा खेळ, भारत विरुद्ध पाकिस्तानचा आत्मविश्वास नेहमीच उच्च असतो. आजच्या सामन्यात आझम खानला विश्रांती घेत आहेत.”
नाणेफेक गमवल्याचं दु:ख रोहित शर्माच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसलं. आपल्या वाटेला प्रथम फलंदाजी आल्यानंतर रोहित शर्माने सांगितलं की, “आम्ही नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी केली असती.परिस्थिती पाहता मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. मागच्या खेळांमुळे आम्हाला येथील परिस्थितीचे मूल्यांकन करण्यात मदत झाली आहे. चांगली धावसंख्या मिळविण्यासाठी फलंदाजी युनिट म्हणून आम्हाला काय करावे लागेल याबद्दल चर्चा केली आहे. त्यानंतर आमच्याकडे बचावासाठी गोलंदाजी युनिट आहे. विश्वचषकात प्रत्येक खेळ महत्त्वाचा असतो, तुम्ही फक्त दाखवू शकत नाही. काहीही होऊ शकते. आम्ही त्याच प्लेइंग इलेव्हनला घेऊन खेळणार.”
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): मोहम्मद रिझवान, बाबर आझम (कर्णधार), उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह, मोहम्मद अमीर.