IND vs PAK : भारत पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द होणार? हवामान खात्याचा अंदाज जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना भारत पाकिस्तान यांच्यात होणार आहे. अवघ्या काही तासात या सामन्याला सुरुवात होणार आहे. पण या सामन्यावेळी पावसाची दाट शक्यता आहे. त्यामुळे सामना सुरु होण्यास वेळ किंवा रद्द होण्याची शक्यता आहे.

IND vs PAK : भारत पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द होणार? हवामान खात्याचा अंदाज जाणून घ्या
| Updated on: Jun 09, 2024 | 6:01 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत पाकिस्तान सामन्याची क्रीडाप्रेमी मोठ्या उत्साहाने वाट पाहात आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या या संघाचे चाहते या सामन्यासाठी आतुर आहेत. मात्र या सामन्यावर पावसाचं विरजन पडण्याची शक्यता आहे. न्यूयॉर्कच्या नासाऊ क्रिकेट मैदानात हा सामना रंगणार आहे. पण पावसामुळे या सामन्यात विघ्न पडू शकते. अक्युवेदरच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेत सामना सुरु असताना मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या वेळेनुसार सकाळी 10 वाजता न्यूयॉर्कमध्ये 40 टक्के पावसाची शक्यता आहे. तीन तासानंतर पावसाचा जोर कमी होईल. पण एक तास मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. AccuWeather.Com नुसार सकाळी 10 वाजता पावसाला सुरुवात होईल आणि नंतर त्याचा जोर वाढत जाईल. तसा हा सामना रद्द होण्याची शक्यता कमीच आहे. पण नासाऊ क्रिकेट स्टेडियममधील खेळपट्टी त्रासदायक ठरू शकते.

AccuWeather.com च्या मते, न्यूयॉर्कमध्ये ढगाळ वातावरण राहील. न्यूयॉर्क आणि भारताच्या वेळेत साडे नऊ तासांचा फरक आहे. न्यूयॉर्क भारताच्या 9.30 तास मागे आहे. भारतात हा सामना रात्री 8 वाजता सुरु होईल. तेव्हा न्यूयॉर्कमध्ये साडे नऊ तास मागे पाहिलं तर ही वेळी सकाळी 10.30 ची आहे. तर हवामान खात्यानुसार पाऊस सकाळी 10 वाजता पडू शकतो. म्हणजेच भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता पाऊस पडण्याची शक्यता आहे. न्यूयॉर्कच्या वेळेनुसार सकाळी 11 AM पावसाची शक्यता 47 टक्के आहे. सामना सुरु झाल्यानंतर वसामुळे वारंवार खंड पडू शकतो. तसेच षटकं कमी करण्याची वेळ येऊ शकते.

डकवर्थ लुईस नियमानुसार दोन्ही संघांनी पाच षटकं खेळली असतील तर निकाल दिला जाईल. एकही षटक खेळलं गेलं नाही तर हा सामना रद्द होईल आणि दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. यामुळे पाकिस्तानचं नुकसान होऊ शकतं. साखळी फेरीसाठी कोणताही दिवस राखीव नाही. उपांत्य आणि अंतिम फेरीसाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आलेला आहे.

दोन्ही संघातील खेळाडू

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, संजू सॅमसन, कुलदीप यादव , यशस्वी जयस्वाल.

पाकिस्तान संघ: मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), बाबर आझम (कर्णधार), उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, आझम खान, इफ्तिखार अहमद, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह, मोहम्मद अमीर, इमाद वसीम, अबरार अहमद, सैम अयुब , अब्बास आफ्रिदी