जेवण किती करावे, गडबडीत जेवल्याने काय होते? रामदेव बाबांनी दिली महत्त्वाची माहिती!
जेवण करताना आपण अनेक चुका करतो. नंतर याच चुका आपल्याला महागात पडू शकतात. रामदेव बाबा यांनी जेवण करताना काय काळजी घ्यावी, याबाबत सांगितले आहे.

Ramdev Baba : आज योगगुरू रामदेव बाबा यांना संपूर्ण देश ओळखतो. आयुर्वेद आणि योगाच्या माध्यमातून ते लोकांना निरोगी कसे राहायचे ते सांगतात. त्यांच्या पतंजली या आयुर्वेद कंपनीतर्फे वेगवेगळी उत्पादने घेतली जातात. पतंजली कंपनीची उत्पादने आज देशभरात आवडीने वापरली जातात. आता रामदेवबाबा यांनी जेवणाची पद्धत कशी असावी? जेवण करताना काय काळजी घ्यावी तसेच चुकीच्या पद्धतीने जेवण केल्यास काय-काय तोटे होऊ शकतात? याची सविस्तर माहिती दिली आहे. बाबा रामदेव यांच्या म्हणण्यानुसार आपण एखाद्या महागड्या फोनची, महागड्या गाडीची ज्या पद्धतीने काळजी घेतो, त्याच पद्धतीने शरीराचीही निगा राखायला हवी. कारण शरीर हे फारच महत्त्वाचे आहे. शरीरा निरोगी ठेवायचे असेल तर खानपानासंदर्भात काय काळजी घ्यायला हवी, याची माहिती रामदेवबाबा यांनी दिली आहे.
भविष्यात आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात
तुम्ही तुमच्या आहाराची, जेवणाची योग्य पद्धतीने काळजी घेत नसाल तर शरीरात वात, पित्तदोष तयार होण्याची शक्यता असते. त्यानंतर भविष्यात तुम्हाला आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. बाबा रामदेव यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही फक्त पोट भरण्यासाठी जेवण करू नका, असे बाबा रामदेव सांगतात. तसेच माईंडफुल ईंटिगवर बाबा रामदेव यांचा भर आहे.
गडबडीत जेवण करण्याची चूक करू नका?
बाबा रामदेव यांच्या म्हणण्यानुसार गडबडीत जेवण करू नये. काही लोक फारच गडबडीत जेवण करतात. अशी चूक केल्यास तुमच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात. जेवण नेहमीच आरामात चावून-चावून करायला हवे. त्यामुळे जेवणातील जीवनसत्त्वे शरीरात शोषले जातात. बाबा रामदेव यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त खाणे टाळायला हवे. प्रमाणेपक्षा जास्त जेवण केल्यास स्ट्रेस, इंझायटी, डिप्रेशन अशा समस्या निर्माण होऊ शकतात. अनेकजण गोड पदार्थदेखील खूप जास्त प्रमाणात खातात. त्यामुळे तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे वजन वाढते. म्हणूनच जेवण खूप जास्त करून नये, असे रामदेव बाबा सांगतात.
बाबा रामदेव यांच्या मतानुसार वेळेवर जेवण करणे फारच गरजेचे आहे. अवेळी जेवण केल्यास हार्मोन्समध्ये चढउतार होतो. त्यामुळे वेळेवर जेवण करणे फार गरजेचे आहे.
