हृदय निरोगी ठेवण्यासाठी रामदेव बाबांनी सांगितला खास उपाय, ही योगासने ठरतील फायदेशीर
Ramdev Baba : सध्याच्या काळात तरुणांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. जंक फूड, जास्त मीठ, साखर आणि तळलेले पदार्थ खाल्ल्याने ही समस्या उद्भवते. रामदेव बाबांनी हृदय निरोगी ठेवण्यासाठी काही योगासने सांगितली आहेत.

Yoga For Heart Health : बदललेल्या जीवनशैलीमुळे कमी वयातच लोकांना विविध आजारांनी ग्रासलेले आहे. अनेक लोकांमध्ये हृदयाशी संबंधित समस्या वाढताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात तरुण पिढीलाही हृदयाच्या समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. अनेकांचे कमी वयात हृदयविकाराच्या धक्काने निधनही झाले आहे. तुम्हालाही तुमच्या हृदयाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर छोटे बदल खूप उपयुक्त ठरू शकतात. यावर योग हा एक उत्तम पर्याय आहे. योगामुळे शरीरावर, मनावर आणि हृदयावर सकारात्मक परिणाम होतो. नियमित योग केल्यास हृदयाचे कार्य सुधारते. यासाठी कोणती योगासने करावीत याबाबत योगगुरू बाबा रामदेव यांनी माहिती दिली आहे.
हृदयाचे आरोग्य का बिघडते?
भारतासह जगातील अनेकांच्या हृदयाचे आरोग्य बिघडलेले आहे. जास्त वेळ एकाच जागी बसणे, शारीरिक हालचाल न करणे यामुळे हृदयावर अधिक ताण येतो. तसेच जंक फूड, जास्त मीठ, साखर आणि तळलेले पदार्थ खाल्ल्याने रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होते, ज्यामुळे हृदयाकडे जाणारा रक्तप्रवाह मंदावतो. या सर्व गोष्टींमुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयाचे नुकसान होते. तसेच सिगारेट ओढणे, दारू पिणे आणि वाढते वायू प्रदूषण यामुळेही हृदयाचे आरोग्य खराब होते. कमी झोप आणि लठ्ठपणा यामुळेही हृदयाचे आरोग्य बिघडते. खराब झालेले हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी रामदेव बाबा यांनी काही योगासने सुचवली आहेत. याची माहिती जाणून घेऊयात.
सूर्यनमस्कार
रामदेव बाबा यांनी सांगितले की, सूर्यनमस्कार केल्याने संपूर्ण शरीर सक्रिय होते. यामुळे रक्त प्रवाह आणि संतुलन सुधारते, परिणामी हृदयावरील ताण कमी होतो आणि ऊर्जा टिकून राहते. नियमितपणे सूर्यनमस्कार केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते.
भुजंगासन
भुजंगासन केल्याने छाती फुलते, त्यामुळे हृदयाच्या स्नायूंना बळकटी मिळते आणि पाठीचा कणा लवचिक बनतो. यामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते, ज्यामुळे हृदयाला मुबलक प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. यामुळे हृदयाचे ठोके स्थिर राहतात आणि थकवा कमी होतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.
पश्चिमोत्तानासन
पश्चिमोत्तानासन केल्याने शरीर आणि मज्जासंस्था शांत होते. यामुळे ताण, चिंता आणि अस्वस्थता कमी होते. यामुळे हृदयाचे ठोके होतात आणि हृदयावरील जास्त दबाव कमी होतो. यामुळे मानसिक संतुलन देखील सुधारते.
दंडासन
दंडासनामुळे श्वसन क्षमता आणि फुफ्फुसांचे कार्य सुधारते. यामुळे रक्तप्रवाह संतुलित होतो व संपूर्ण शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह सुधारला जातो. यामुळे हृदयावरील अनावश्यक दबाव कमी होतो. त्यामुळे हृदय दीर्घकाळ निरोगी आणि मजबूत राहते.
हृदयाच्या आरोग्यासाठी हे देखील महत्त्वाचे आहे
- दिवसातून 30 मिनिटे वेगाने चालणे किंवा हलका व्यायाम करा
- मीठ, साखर आणि तळलेले पदार्थ खाणे टाळा
- पुरेशी झोप घ्या आणि चिंता करणे टाळा
- धूम्रपान आणि मद्यपान टाळा
