Video : IND vs PAK मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या बुमराहला त्याची बायको Live मुलाखतीमध्ये म्हणाली, आज…

Jasprit Bumrah and Sanjana Ganesan Video : भारत आणि पाकिस्तान सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या बुमराहचा त्याचीच पत्नी संजनाने मुलाखत घेतली. आपला नवरा मॅन ऑप द मॅच ठरल्यावर त्याची मुलाखत म्हणजे कोणत्याही पत्नीसाठी मोठी गोष्ट असते. दोघांची मुलाखत झाल्यावर शेवटला काय म्हणाले व्हिडीओमध्ये पाहा.

Video : IND vs PAK मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या बुमराहला त्याची बायको Live मुलाखतीमध्ये म्हणाली, आज...
Jasprit Bumrah and Sanjana Ganesan Video
Follow us
| Updated on: Jun 11, 2024 | 9:05 PM

भारत आणि पाकिस्तामधील सामना क्रिकेट प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच ठरते. आताही वर्ल्ड कपमध्ये झालेला भारत-पाक सामना एकदम थरारक आणि श्वास रोखून धरणारा होता. भारताला अवघ्या 119 धावांवर गुंडाळलं होतं, भारताचा वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघ आणखीन एक पराभव करणाक असं चित्र झालं होतं. मात्र भारतीय खेळाडूंनी आपली संपूर्ण ताकद लावत हा सामना आपल्या पारड्यात झुकवला. या सामन्यामध्ये भारतीय संघाचं ब्रह्मास्त्र असलेला वेगवान गोलंदाज हा जसप्रीत बुमराह मॅचविनर खेळाडू ठरला. गडी कायम जेव्हा संघ अडचणीमध्ये सापडतो तेव्हा संकटमोचक म्हणून धावून येतो. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यातही त्याने आपला दांडपट्टा चालवला आणि सामना आपल्या बाजुने खेचला.  याच मॅचविनरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

भारत आणि पाकिस्तानमधील सामन्यानंतर जसप्रीत बुमराह याची पत्नी संजना हिने त्याची मुलाखत घेतली. आम्ही दबावामध्ये असताना विजय मिळवला याचा आनंद आहे. आम्ही घाबरलो नाहीत कारण त्या पिचवर धावा काढणं कठिण जात होतं. एकत्र येत आम्ही लढलो आणि विजय संपादित केल्याचं जसप्रीत बुमराहने सांगितलं. आयसीसी डिजिटल इनसाइडर आणि स्पोर्ट्स प्रेझेंटर म्हणून बुमराहची पत्नी संजना गणेशन काम पाहते.

पाहा व्हिडीओ:-

मुलाखत संपत आल्यावर बुमराह संजनाला म्हणाला, की तीन मिनिटांनी आपण भेटणार आहोत. यावर संजनानेही त्याला, आजच डिनरमध्ये काय आहे असा मजेशीर प्रश्न त्याला केला. दोघांचाही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बुमराह भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज असून कित्येक सामने आपल्या एकट्याच्या गोलंदाजीवर भारतीय संघाला काढून दिले आहेत.

दरम्यान, पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराह याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. फक्त याच नाहीतर आयर्लंडलविरूद्धही झालेल्या सामन्यामध्ये हा किताब पटकवला. वर्ल्डकपच्या सलग दोन सामन्यांमध्ये बुमराह या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन: बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान, उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह आणि मोहम्मद अमीर.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत (विकटेकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग

Non Stop LIVE Update
उद्ध्वस्त करणारा तू कोण? भुजबळांच्या टीकेवरून जरांगेंना हाकेंचा सवाल
उद्ध्वस्त करणारा तू कोण? भुजबळांच्या टीकेवरून जरांगेंना हाकेंचा सवाल.
याला शिक्षण द्या आधी, माझ्यासमोर लायकी..., हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल
याला शिक्षण द्या आधी, माझ्यासमोर लायकी..., हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल.
आता सरकार तुम्हालाही पाणी पाजेल, जरांगेंचा हाकेंना सावधगिरीचा सल्ला
आता सरकार तुम्हालाही पाणी पाजेल, जरांगेंचा हाकेंना सावधगिरीचा सल्ला.
अटल सेतूवर पडल्या भली मोठी भेग, पटोलेंनी केला शिंदे सरकारचा पर्दाफाश
अटल सेतूवर पडल्या भली मोठी भेग, पटोलेंनी केला शिंदे सरकारचा पर्दाफाश.
आम्हाला फसवलं तर...,डिस्चार्ज मिळताच जरांगेंनी गिरीश महाजनांना फटकारलं
आम्हाला फसवलं तर...,डिस्चार्ज मिळताच जरांगेंनी गिरीश महाजनांना फटकारलं.
मर्द-षंढशिवाय ज्यांच्याकडे शब्द नाही, त्यांनी योग करावा, शेलारांचा रोख
मर्द-षंढशिवाय ज्यांच्याकडे शब्द नाही, त्यांनी योग करावा, शेलारांचा रोख.
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी, राज्यात येत्या 5 दिवसात....
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी, राज्यात येत्या 5 दिवसात.....
पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा; फडणवीस यांची कोणाकडे विनंती?
पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा; फडणवीस यांची कोणाकडे विनंती?.
माझा अपघात..., बच्चू कडूंच्या जीवाला धोका, पोलीस अधीक्षकांना थेट पत्र
माझा अपघात..., बच्चू कडूंच्या जीवाला धोका, पोलीस अधीक्षकांना थेट पत्र.
आज 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस; श्रीनगरमधून मोदींचा योगसंदेश, म्हणाले
आज 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस; श्रीनगरमधून मोदींचा योगसंदेश, म्हणाले.