PAK vs CAN: Aaron Johnsonचा अर्धशतकी तडाखा, पाकिस्तानला झोडला

Aaron Johnson Fifty PAK vs CAN: कॅनडाचा अनुभवी फलंदाज आरोन जॉनसन याने पाकिस्तान विरुद्ध सिक्स खेचत वादळी अर्धशतक ठोकलं आहे.

PAK vs CAN: Aaron Johnsonचा अर्धशतकी तडाखा,  पाकिस्तानला झोडला
Aaron Johnson Canada
Follow us
| Updated on: Jun 11, 2024 | 9:30 PM

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 22 व्या सामन्यात कॅनडाच्या आरोन जॉनसन याने टीम अडचणीत असताना निर्णायक क्षणी पाकिस्तान विरुद्ध खणखणीत अर्धशतक ठोकलंय. ज्या खेळपट्टीवर आतापर्यंत इतर संघांना 120-130 धावांपर्यंत पोहचण्यात संघर्ष करावा लागलाय, तिथे आरोनने अर्धशतक ठोकलंय. आरोनने या अर्धशतकी खेळीसह कॅनडाचा डाव सावरला आणि समाधानकारक स्थितीत आणून ठेवलं.

आरोनने पाकिस्तानच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. इतर सहकारी फलंदाज विकेट टाकून माघारी परतले. मात्र आरोनने एक बाजू लावून धरली.आरोनने या दरम्यान एकेरी दुहेरी धावा घेतल्या. तसेच संधी मिळाली तेव्हा मोठे फटके मारले आणि अर्धशतक झळकावलं. आरोनने 13 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर खणखणीत सिक्स ठोकला आणि अर्धशतक पूर्ण केलं. cने 39 बॉलमध्ये 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 118.18 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक ठोकलं. आरोनच्या टी 20 आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील हे सहावं अर्धशतक ठरलं.

न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियममधील हा सातवा सामना आहे. याआधी या मैदानात टी 20 वर्ल्ड कपमधील 6 सामने पार पडले. या मैदानात खेळपट्टीमुळे धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. मात्र आरोनने या पुढे जात दे देणादण बॅटिंग केली आणि अर्धशतक ठोकलं. आरोनला अर्धशतकानंतर मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र नसीम शाहने त्याला क्लिन बोल्ड करत कॅनडाला मोठा झटका दिला. आरोनने 44 बॉलमध्ये 52 धावांची खेळी केली.

आरोन जॉन्सची अर्धशतकी खेळी

कॅनडा प्लेइंग ईलेव्हन : साद बिन जफर (कॅप्टन), श्रेयस मोव्वा (विकेटकीपर), आरोन जॉन्सन, नवनीत धालीवाल, परगट सिंग, निकोलस किर्टन, रविंदरपाल सिंग, डिलन हेलिगर, कलीम सना, जुनैद सिद्दीकी आणि जेरेमी गॉर्डन.

पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन: बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सॅम अयुब, फखर जमान, उस्मान खान, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ आणि मोहम्मद अमीर.

Non Stop LIVE Update
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल.
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?.
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले.
हा रस्ता की नदी... पूर आल्यानं चिमुरड्यांसह वृद्धांचा जीवघेणा प्रवास
हा रस्ता की नदी... पूर आल्यानं चिमुरड्यांसह वृद्धांचा जीवघेणा प्रवास.