
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 22 व्या सामन्यात ए ग्रुपमधील पाकिस्तान विरुद्ध कॅनडा आमनेसामने आहेत. बाबर आझम पाकिस्तानचं आणि साद बिन जफर कॅनडाचं नेतृ्त्व करतोय. नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियममधील हा सातवा सामना आहे. या सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजून 32 मिनिटांनी टॉस झाला. अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकला. कॅप्टन बाबर आझमने फिल्डिंगचा निर्णय घेत कॅनडाला बॅटिंगसाठी बोलावलं आहे. पाकिस्तान आणि कॅनडा या दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील तिसरा सामना आहे. कॅनडाने 2 पैकी 1 सामना जिंकलाय आणि गमावलाय. तर पाकिस्तानला दोन्ही सामन्यात अपयश आलं. यूएसए आणि टीम इंडियाने पाकिस्तानला पराभूत केलंय. त्यामुळे सुपर 8 मधील आव्हान कायम राखायचं असेल, तर पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीत कॅनडा विरुद्धचा सामना जिंकावा लागणार आहे.
पाकिस्तान आणि कॅनडा या दोन्ही संघांनी या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये प्रत्येकी 1-1 बदल केले आहेत. सॅम अय्युब याचं पाकिस्तान टीममध्ये कमबॅक झालं आहे. तर इफ्तिखार अहमद याला बाहेर बसवण्यात आलं आहे. तर कॅनडाने दिलप्रीत बाजवा याला बाहेर केलं आहे. तर रवींदरपाल सिंह याचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश केला आहे. कॅप्टन साज बिन झफर याने टॉस दरम्यान याबाबतची माहिती दिली.
दरम्यान टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासात दुसऱ्यांदा आणि टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत दोन्ही संघ पहिल्यांदा आमनेसामने आहेत. याआधी उभयसंघात झालेल्या सामन्यात पाकिस्तानने कॅनडावर विजय मिळवला होता. त्यामुळे आता पाकिस्तान कॅनडा विरुद्ध दुसरा विजय मिळवणार की कॅनडा उलटफेक करणार? याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
पाकिस्तानने टॉस जिंकला
📸🪙©️#PAKvCAN | #T20WorldCup | #WeHaveWeWill pic.twitter.com/OmecmdKyRp
— Pakistan Cricket (@TheRealPCB) June 11, 2024
कॅनडा प्लेइंग ईलेव्हन : साद बिन झफर (कॅप्टन), श्रेयस मोव्वा (विकेटकीपर), आरोन जॉन्सन, नवनीत धालीवाल, परगट सिंग, निकोलस किर्टन, रविंदरपाल सिंग, डिलन हेलिगर, कलीम सना, जुनैद सिद्दीकी आणि जेरेमी गॉर्डन.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन: बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सैम अयुब, फखर जमान, उस्मान खान, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ आणि मोहम्मद अमीर.