T20 World Cup : रोहित शर्मा या चार खेळाडूंना पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात डावलणार! का ते समजून घ्या
टी20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली असून भारताचा पहिलाचा सामना आयर्लंड विरुद्ध आहे. कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्धच्या प्लेइंग 11 ची झलक दाखवून दिली आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून कर्णधार रोहित शर्माने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहली सलामीला उतरणार हे स्पष्ट झालं आहे. प्लेइंग 11 मध्ये यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन यांना स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे पुढच्या सामन्यातही अशीच प्लेइंग 11 असेल यात शंका नाही. कारण भारताचे पुढचे दोन्ही सामने याच मैदानावर होणार आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विचारपूर्वक 11 खेळाडूंची निवड केली आहे यात शंका नाही. भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असल्याचं दिसून आहे. मोक्याच्या वेळी गोलंदाजी आणि फलंदाजी करण्याची क्षमता या खेळाडूंमध्ये आहे. यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन दोघंही तसं पाहिलं तर गोलंदाजी करत नाहीत. त्यामुळे त्यांना प्लेइंग इलेव्हनमधून डावलण्यात आल्याचं दिसत आहेत. फलंदाजीची संपूर्ण धुरा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यांच्या खांद्यावर असेल. तर शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल हे अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत असतील. तर गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे हा संघ पुढच्या काही सामन्यांमध्ये कायम असेल यात शंका नाही.
नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा याने सांगितलं की, “आम्ही गोलंदाजी करणार आहोत. तयारी झाली आहे. या नवीन परिस्थितीत व्यवस्थितरित्या व्यवस्थापन करत आहोत. आव्हानात्मक आहे पण आम्ही तयार आहोत. आम्ही अशाच खेळपट्टीवर खेळलो आणि काय होऊ शकतं याची माहित आहे. कुलदीप यादव, संजू सॅमसन, जयस्वाल आणि युझवेंद्र चहल संघात नाहीत.” भारताचा पुढचा सामना याच मैदानावर पाकिस्तानविरुद्ध आहे. 9 जूनला हा सामना होणार आहे. त्या सामन्यातही रोहित शर्मा याच प्लेइंग 11 सह मैदानात उतरेल, असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे.
भारत आयर्लंड सामन्यातील दोन्ही संघांची प्लेइंग 11
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.
आयर्लंड (प्लेइंग इलेव्हन): पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट.
