टी20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिज की इंग्लंड! कोणाला किती संधी ते जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठीची लढत आता रंगतदार वळणावर आली आहे. गट 2 मध्ये प्रत्येक संघाचे दोन दोन सामने सामने झाले आहेत. त्यामुळे आता उपांत्य फेरीत कोण धडक मारणार याची उत्सुकता लागून आहे. दक्षिण अफ्रिकेचं स्थान जवळपास निश्चित आहे.पण काही गडबड झाली तर मग कठीण होऊन बसेल. तर इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये चुरस आहे. चला जाणून घेऊयात

टी20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिज की इंग्लंड! कोणाला किती संधी ते जाणून घ्या
| Updated on: Jun 22, 2024 | 4:26 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील गट 2 मध्ये उपांत्य फेरीसाठी जबरदस्त चुरस आहे. खरं तर अजूनही कोणत्याही संघाचं उपांत्य फेरीचं निश्चित नाही. पण त्यातल्या त्यात दक्षिण अफ्रिका संघाचं गणित पाहता संधी मिळू शकते. तर वेस्ट इंडिज आणि इंग्लंडला उपांत्य फेरीसाठी चुरस आहे. इतकंच काय तर अमेरिका इंग्लंडचं गणित बिघडवू शकते. 23 जून रोजी अमेरिका आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. हा सामना इंग्लंडच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. तर 24 जून रोजी वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात सामना होणार आहे. हा सामना तर संपूर्ण गुणतालिकेचं चित्र पालटू शकतो. त्यामुळे जयपराजयासोबत नेट रनरेटही खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. असं असताना अमेरिकेचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.पण इंग्लंडची वाट अडवू शकते. चला जाणून घेऊयात या गुणातालिकेबाबत

इंग्लंड विरुद्ध अमेरिका

इंग्लंडला उपांत्य फेरी गाठण्याची चांगली संधी आहे. शेवटचा सामना अमेरिकेसोबत आहेत. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून नेट रनरेट चांगला ठेवावा लागेल. कारण नेट रनरेटच्या बाबतीत वेस्ट इंडिज आघाडीवर आहे. त्यामुळे नुसता सामना जिंकून चालणार नाही तर नेट रनरेटही चांगला ठेवावा लागेल. या सामन्यात अमेरिकेने पराभूत केलं तर मात्र उपांत्य फेरीचं गणित बिघडू शकतं. सध्या इंग्लंडचा संघ 2 सामन्यापैकी एका सामन्यात विजय मिळवून 2 गुण आणि +0.412 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहे.

अमेरिकेनं इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकला आणि वेस्ट इंडिजला दक्षिण अफ्रिकेनं पराभूत केलं तर अमेरिकेला संधी मिळू शकते. कारण अमेरिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजचे प्रत्येकी दोन गुण होतील. तसेच नेट रनरेटच्या आधारावर उपांत्य फेरीचा दुसरा संघ ठरेल. त्यामुळे दोन्ही सामने एकमेकांवर अवलंबून आहेत.

दक्षिण अफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज

दक्षिण अफ्रिकेचा शेवटचा सामना वेस्ट इंडिजसोबत आहे. हा सामना 24 जूनला होणार आहे.हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. कारण इंग्लंडने अमेरिकेला मोठ्या फरकाने पराभूत केलं तर इंग्लंडचे 4 गुण होतील आणि नेट रनरेटही सुधारेल. अशावेळी दक्षिण अफ्रिकेला वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना काहीही करून जिंकावाच लागेल. हा सामना जिंकला तर दक्षिण अफ्रिकेला थेट एन्ट्री मिळेल. पण गमावला तर वेस्ट इंडिज आणि इंग्लंडपेक्षा नेट रनरेट चांगला राहिला पाहीजे.

वेस्ट इंडिजचं गणितही इंग्लंडसारखंच आहे. शेवटचा सामना जिंकला तर पाहीजे. पण नेट रनरेटही चांगला असणं गरजेचं आहे. वेस्ट इंडिजने दक्षिण अफ्रिकेला पराभूत केलं, दुसरीकडे इंग्लंडने अमेरिकेला पराभूत केलं. तर तीन संघांचे प्रत्येकी 4 गुण होतील. त्यामुळे उपांत्य फेरीच्या दोन संघांचं गणित नेट रनरेटच्या आधारावर होईल.