AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2024 : स्मृती मंधानाला अखेर सूर गवसला, श्रीलंकेविरुद्ध 38 चेंडूत अर्धशतकी खेळी

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील महत्त्वाचा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु आहे. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांनी चांगली सुरुवात करून दिली. तसेच स्मृती मंधानाने आक्रमक फलंदाजी करत अर्धशतक ठोकलं.

T20 World Cup 2024 : स्मृती मंधानाला अखेर सूर गवसला, श्रीलंकेविरुद्ध 38 चेंडूत अर्धशतकी खेळी
Image Credit source: BCCI
| Updated on: Oct 09, 2024 | 9:18 PM
Share

वुमन्स टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या 12व्या सामन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना होत आहे. साखळी फेरीतील दोन्ही संघांचा हा तिसरा सामना आहे. हा सामना स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी दोन्ही संघांची धडपड सुरु आहे. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून शफाली वर्मा आणि डावखुरी स्मृती मंधाना ही जोडी मैदानात उतरली. या जोडीने संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. दोघांनी आक्रमक पण सावध खेळी केली. 13 षटकापर्यंत ही जोडी तग धरून होती. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी केली. स्मृती मंधाना धाव घेताना फसली आणि विकेट देऊन बसली. पण तिथपर्यंत स्मृती मंधानाने आपली भूमिका बजावली होती. तिने 38 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 50 धावा केल्या. तिच्या या खेळीमुळे भारताला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत झाली.त्यानंतर शफाली 43 धावांवर असताना चमारी अटापट्टूच्या गोलंदाजीवर बाद झाली.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताकडून स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांची चौथी सर्वाधिक धावांची भागीदारी ठरली. 2018 टी20 वर्ल्डकपमध्ये हरमनप्रीत कौर आमि जेमिमाह रॉड्रिग्स यांनी न्यूझीलंडविरुद्ध 134 धावांची भागीदारी केली होती. मिताली राज आणि पुनम राऊत यानी 2014 टी20 वर्ल्डकपमध्ये 117 धावांची भागीदारी केली होती. 2014 मध्ये मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यांच्यात 107 धावांची भागीदारी झाली होती. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये स्मृती मंधाना आणि शफाली वर्माने 98 धावांची भागीदारी केली आहे. पाचव्या क्रमांकावर मिताली राज आणि सुलक्षणा नाईक यांच्यातील भागीदारी राहिली. श्रीलंकेविरुद्ध 2010 मध्ये 86 धावांची भागीदारी केली होती.

दरम्यान, स्मृती मंधाना बाद झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरचा शो पाहायला मिळाला. हरमनप्रीतने दोन सामन्यातील राग काढला असं म्हणायला हरकत नाही. हरमनप्रीत कौरने 27 चेंडूत 52 धावा केल्या. यात तिने 8 चौकार आणि षटकार मारला. अर्धशतकी खेळी करताना तिचा स्ट्राईक रेट हा 192.59 इतका होता.  भारताने 20 षटकात 3 गडी गमवून 172 धावा केल्या आणि विजयासाठी 173 धावांचं आव्हान दिलं आहे.

Follow Us
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
Rohini Khadse | लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद! रोहिणी खडसेंनी सरकारला कोंडीत पकडलं
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक
Shaina NC | शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक; अज्ञातांकडून पैशांची मागणी सुरू!
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!
नागपूरकरांचा गौरव, देवाभाऊंचा नवा विक्रम; ठाकरेंना डिवचण्यासाठी झळकले
नागपूरकरांचा गौरव... देवाभाऊंचा नवा विक्रम; उद्धव ठाकरेंना डिवचण्यासाठीच झळकले मुख्यमंत्री फडणवीसांचे होर्डिंग्ज
पवार नाराज? वर्षा बंगल्यावर नेमकं काय घडलं?; तटकरेंनीच दिलं स्पष्टीकरण
Sunil Tatkare UNCUT | सुनेत्रा पवार नाराज? वर्षा बंगल्यावर नेमकं काय घडलं?; अखेर सुनील तटकरे यांनीच दिलं मोठं स्पष्टीकरण
पाटील, आव्हाड हे फ्री बर्ड्स... एकनाथ शिंदेच्या भेटीवर राऊतांचा टोला
Sanjay Raut | जयंत पाटील, आव्हाड हे फ्री बर्ड्स... एकनाथ शिंदेच्या भेटीवर राऊतांचा खोचक टोला
राणांच्या दाव्यावर तटकरे यांची मिश्कील प्रतिक्रिया; ते फार मोठे नेते..
Sunil Tatkare | रवी राणांच्या दाव्यावर सुनील तटकरे यांची मिश्कील प्रतिक्रिया; ते फार मोठे नेते...
महेश ट्युटोरियल्सचा मोठा धक्का! राज्यभरातील 33 सेंटर अचानक बंद
Mahesh Tutorials | महेश ट्युटोरियल्सचा मोठा धक्का! राज्यभरातील 33 सेंटर अचानक बंद; 2,500 विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी
नागपूरच्या कमाल चौकात भरदिवसा फायरिंग! अजय चिंचखेडेवर जीवघेणा हल्ला
Nagpur | नागपूरच्या कमाल चौकात भरदिवसा फायरिंग! अजय चिंचखेडेवर जीवघेणा हल्ला, पुढील तपास सुरू
Jayant Patil: जयंत पाटील राज्याचे नवीन अर्थमंत्री? शिंदेंच्या बंगल्यावर काय घडले? मोठी घडामोड काय?.

Jayant Patil: जयंत पाटील राज्याचे नवीन अर्थमंत्री? शिंदेंच्या बंगल्यावर काय घडले? मोठी घडामोड काय?

Parth Pawar: पार्थ पवारांना केंद्रात मंत्री करा, बड्या नेत्याचं थेट पत्र; राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी?.

Parth Pawar: पार्थ पवारांना केंद्रात मंत्री करा, बड्या नेत्याचं थेट पत्र; राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी?

ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांचे फोटो एकाच बॅनरवर, विविध चर्चांना उधाण, धाराशिवमध्ये...

ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांचे फोटो एकाच बॅनरवर, विविध चर्चांना उधाण, धाराशिवमध्ये..

स्वस्तात मस्त पोस्टपेड प्लॅन हवा ? BSNL च्या या प्लॅनमध्ये मिळतात भन्नाट फायदे; किंमत फक्त...

स्वस्तात मस्त पोस्टपेड प्लॅन हवा ? BSNL च्या या प्लॅनमध्ये मिळतात भन्नाट फायदे; किंमत फक्त..

आम्ही अमित शाहांच्या गटासोबत कसे जाणार? संघाच्या बालेकिल्ल्यातून संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर थेट हल्लाबोल.

आम्ही अमित शाहांच्या गटासोबत कसे जाणार? संघाच्या बालेकिल्ल्यातून संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर थेट हल्लाबोल

Hasan Mushrif :  ‘असं करून चालणार नाही’, अर्थखातं राष्ट्रवादी द्यायला शिवसेनेचा विरोध, त्यावर हसन मुश्रीफ यांची स्पष्ट भूमिका.

Hasan Mushrif : ‘असं करून चालणार नाही’, अर्थखातं राष्ट्रवादी द्यायला शिवसेनेचा विरोध, त्यावर हसन मुश्रीफ यांची स्पष्ट भूमिका