T20 World Cup 2028: टी20 वर्ल्डकपच्या पुढच्या पर्वासाठी 12 संघ ठरले, 8 जागांसाठी होणार लढत

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा संपली असून आता स्पर्धेच्या पुढच्या पर्वाचे वेध लागले आहेत. दोन वर्षांनी म्हणजेच 2028 साली टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं 11वं पर्व पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी 20 पैकी 12 संघ ठरले आहेत. तर 8 संघांची निवड पात्रता फेरीतून होणार आहे.

T20 World Cup 2028: टी20 वर्ल्डकपच्या पुढच्या पर्वासाठी 12 संघ ठरले, 8 जागांसाठी होणार लढत
T20 World Cup 2028: टी20 वर्ल्डकपच्या पुढच्या पर्वासाठी 12 संघ ठरले, 8 जागांसाठी होणार लढत
Image Credit source: ICC Twitter
| Updated on: Mar 10, 2026 | 8:20 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदाचा मान टीम इंडियाला मिळाला आहे. अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव केला आणि तिसऱ्यांदा जेतेपद मिळवलं. त्यामुळे टीम इंडियाच्या जर्सीवर आता 3 स्टार असणार आहेत. असं असताना टी20 वर्ल्डकप 2028 स्पर्धेची चर्चा सुरू झाली आहे. कारण टी20 वर्ल्डकप स्पर्धा दर दोन वर्षांनी असते. 2028 टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांकडे आहे. ही स्पर्धा 2028 मध्ये ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. या वर्ल्डकप स्पर्धेतील एकूण 20 संघ असतील. असं असताना या स्पर्धेसाठी 12 ठरले असून 8 जागांसाठी इतर संघांमध्ये चुरस असणार आहे. 2028 टी20 वर्ल्डकप स्पर्धा न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात होणार आहे. त्यामुळे दोन्ही देशांची यजमान म्हणून थेट निवड झाली आहे. ऑस्ट्रेलियाचं 2026 स्पर्धेत साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलं होतं.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत ज्या संघांनी जागा मिळवली होती. त्या संघांना थेट तिकीट मिळलं आहे. त्यापैकी न्यूझीलंडचा संघ यजमान असल्याने थेट जागा मिळाली. त्यामुळे भारत, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांना 2028 टी20 वर्ल्डकपचं तिकीट मिळालं आहे. आयसीसी रँकिंगच्या आधारावर अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि आयर्लंड या संघांना संधी मिळाली आहे. यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेतून बांगलादेशने माघार घेतली होती. पण आयसीसी रँकिंगच्या आधारावर पुढच्या स्पर्धेचं तिकीट मिळालं आहे.

टी20 वर्ल्डकप 2028 स्पर्धेसाठी आता 8 जागा शिल्लक आहेत. या 8 जागांसाठी प्रादेशिक पात्रता फेरीतून निवड होणार आहे. विजेत्या संघांना 2028 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे. यंदा टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळलेल्या 8 संघांना आता पुढचे दोन वर्षे संघर्ष करून पुढच्या स्पर्धेत भाग घ्यावा लागेल. यात अमेरिका, नेदरलँड, नामिबिया, ओमान, इटली, नेपाळ, स्कॉटलँड, युएई आणि कॅनडा या संघांचा सहभाग आहे. यंदाच्या पर्वात बांगलादेशने ऐनवेळी माघार घेतल्याने स्कॉटलँडला संधी मिळाली होती. आता पुढच्या पर्वासाठी जोरदार मेहनत घ्यावी लागणार आहे. यापैकी काही संघ पुढच्या पर्वात पात्र ठरतील की नाही याबाबतही शंका आहे. कदाचित काही नव्या संघाचा सहभाग असू शकतो.

Follow Us