Womens World Cup: 16 चौकार-षटकार मारत दक्षिण अफ्रिकेच्या ब्रिट्सचं शतक, मोठा विक्रम केला नावावर

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या सातव्या सामन्यात न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका आमनेसामने आले होते. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने न्यूझीलंडवर विजय मिळवला. या सामन्यात टॅज्मिन ब्रिट्सने शतकी खेळी. तसेच एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

Womens World Cup: 16 चौकार-षटकार मारत दक्षिण अफ्रिकेच्या ब्रिट्सचं शतक, मोठा विक्रम केला नावावर
16 चौकार-षटकार मारत दक्षिण अफ्रिकेच्या ब्रिट्सचं शतक, मोठा विक्रम केला नावावर
Image Credit source: Getty Images
| Updated on: Oct 06, 2025 | 9:56 PM

आयसीसी वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेतील सातवा सामना न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका या संघात पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण या सामन्यात न्यूझीलंडचा संघ काय खास करू शकला नाही. 47.5 षटकात सर्व गडी गमवून 231 धावा केल्या आणि विजयासाठी 232 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेने 40.5 षटकात चार गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह दक्षिण अफ्रिकेने पहिल्या विजयाची नोंद केली. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेच्या टॅज्मिन ब्रिट्सची बॅट चांगलीच तळपली. तिने वनडे वर्ल्डकमध्ये शतकी खेळीसोबत एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.

न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या 232 धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेला 26 धावांवर पहिला धक्का बसला होता. पण टॅज्मिन ब्रिट्सने एका बाजूने आक्रमक खेळी सुरुच ठेवली आणि वेगाने धावगती वाढवली. टॅज्मिन ब्रिट्सने 89 चेंडूत 101 धावांची खेळी केली. यात 15 चौकार आणि 1 षटकार मारला. टॅज्मिन ब्रिट्सने वनडे करिअरमध्ये सातव्यांना शतक ठोकलं आहे. विशेष म्हणजे टॅज्मिन ब्रिट्सने सात पैकी 5 शतकं याच वर्षी ठोकली आहेत. यासह वनडे क्रिकेटमध्ये एकाच वर्षात पाच शतके ठोकणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे.

टॅज्मिन ब्रिट्सने शतकांची हॅटट्रीक देखील साजरं केलं. वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी ब्रिट्सने पाकिस्तान विरूद्धच्या मालिकेत हा कारनामा केला होता. तसेच महिला वनडे क्रिकेटमध्ये सलग तीन शतके ठोकणारी पहिली दक्षिण अफ्रिकन खेळाडू ठरली आहे. ब्रिट्सने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिलं शतक ठोकलं होतं. त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत सलग दोन शतक ठोकली होती. आता न्यूझीलंडविरुद्ध वनडे वर्ल्डकपमध्ये शतक ठोकलं. म्हणजेच मागच्या पाच सामन्यात तिने 4 शतकं ठोकली आहे.

टॅज्मिन ब्रिट्सने या वर्षी एकूण 11 वनडे सामने खेळले. यात तिने 83.22 च्या सरासरीने 749 धावा केल्या ठआहे. यात पाच शतकं आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त 5 धावा करून बाद झाली होती.