India vs Bangladesh Womens T20 WC Live Score Updates : बांगलादेशला तिसरा झटका, शोभना मोस्तरी आऊट
India vs Bangladesh Womens T20 World Cup 2026 Live Score Updates: वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आशियातील 2 संघ आमनेसामने आहेत. बांगलादेश आणि टीम इंडिया यांच्यात उपांत्य फेरीच्या हिशोबाने हा सामना फार महत्त्वाचा आहे.

LIVE Cricket Score & Updates
-
IND vs BANW T20 WC Live Score Updates : बांगलादेशला तिसरा झटका, शोभना मोस्तरी आऊट
टीम इंडियाने बांगलादेशला तिसरा झटका दिला आहे. राधा यादव हीने शोभना मोस्तरी हीला दीप्ती शर्मा हीच्या हाती कॅच आऊट केलं आहे. शोभना मोस्तरी हीने 26 बॉलमध्ये 22 रन्स केल्या.
-
IND vs BANW T20 WC Live Score Updates : जुएरिया फिरदोस आऊट, बांगलादेशला दुसरा झटका, नंदीनी शर्माला पहिली विकेट
नंदीनी शर्मा हीने आपली पहिली विकेट घेत बांगलादेशला दुसरा झटका दिला आहे. नंदीनीने आपल्याच बॉलिंगवर जुएरिया फिरदोस हीला कॅच आऊट केलं. जुएरिया हीने 31 बॉलमध्ये 33 रन्स केल्या.
-
-
IND vs BANW T20 WC Live Score Updates : बांगलादेशच्या पावरप्लेमध्ये 40 धावा, टीम इंडिया दुसऱ्या विकेटच्या शोधात
भारत-बांगलादेश वुमन्स सामन्यातील पहिल्या डावातील पावरप्लेचा खेळ संपला आहे. बांगलादेशने 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 40 धावा केल्या आहेत. तर टीम इंडिया दुसऱ्या विकेटच्या शोधात आहे.
-
IND vs BANW T20 WC Live Score Updates : बांगलादेशला पहिला झटका, दिलारा अख्तर आऊट
रेणूका सिंह ठाकुर हीने भारताला पहिली विकेट मिळवून दिली आहे. रेणूकाने बांगलादेशच्या दिलारा अख्तर हीला आऊट केलं आहे. दिलाराने 8 बॉलमध्ये 4 रन्स केल्या.
-
IND vs BANW T20 WC Live Score Updates : सामन्याला सुरुवात, बांगलादेशची सलामी जोडी मैदानात
भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याला सुरुवात झाली आहे. बांगलादेशने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशकडून दिलारा आणि फिरदोस ही सलामी जोडी मैदानात आली आहे. तर भारताकडून शफाली वर्मा पहिली ओव्हर टाकत आहे.
-
-
IND vs BANW T20 WC Live Updates : बांगलादेश वुमन्स प्लेइंग ईलेव्हन
बांगलादेश वुमन्स प्लेइंग ईलेव्हन : दिलारा अक्टर, जुएरिया फिरदोस, शर्मीन अख्तर, निगार सुल्ताना (कर्णधार आणि विकेटकीपर), शोभना मोस्तरी, रितू मोनी, शोर्ना अक्टर, राबेया खान, नाहिदा अक्टर, शांजिदा अक्टर मेघला आणि मारुफा अक्टर.
-
IND vs BANW T20 WC Live Updates : टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मानधना, शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, राधा यादव, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर आणि नंदनी शर्मा.
-
IND vs BANW T20 WC Live Updates : बांगलादेशने टॉस जिंकला, टीम इंडिया विरुद्ध निर्णय काय?
बांगलादेशने टीम इंडिया विरुद्ध टॉस जिंकला आहे. बांगलादेशची कर्णधार निगर सुल्ताना हीने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाज बांगलादेशला किती धावांवर रोखण्यात यशस्वी ठरणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
IND vs BANW T20 WC Live Updates : बांगलादेश वुमन्स टीम
दिलारा अक्टर, जुएरिया फिरदौस, शर्मीन अख्तर, निगार सुलताना (कॅप्टन आणि विकेटकीपर), शोभना मोस्तरी, रितू मोनी, शोर्ना अक्टर, राबेया खान, नाहिदा अक्टर, शांजिदा अक्टर मेघला, मारुफा अक्टर, फहिमा खातून, फरीहा त्रिस्ना, सुलताना खातून आणि ताज नेहार.
-
IND vs BANW T20 WC Live Updates : वुमन्स टीम इंडिया
वुमन्स टीम इंडिया : स्मृती मंधाना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, प्रेमा रावत, श्री चरणी, नंदनी शर्मा, रेणुका सिंग ठाकूर, राधा यादव, क्रांती गौड आणि भारती फूलमाळी.
-
IND vs BANW T20 WC Live Updates : टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश निर्णायक सामना
टीम इंडियासमोर आयसीसी वुमन्स टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील चौथ्या सामन्यात बांगलादेशचं आव्हान आहे. उभयसंघातील सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
आयसीसी वुमन्स टी20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 23 व्या सामन्यात टीम इंडियासमोर बांगलादेशचं आव्हान आहे. दोन्ही संघांचा हा चौथा आणि उपांत्य फेरीच्या हिशोबाने अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. दोन्ही संघांनी 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर 1-1 सामना गमावला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीच्या समीकरणानुसार भारताला हा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावा लागणार आहे. त्यामुळे टीम इंडिया या अटीतटीच्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध कशी कामगिरी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सामन्यातील अपडेट लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.