Hardik Pandya : भाड में जाओ.., हार्दिकला माहिकासमोर असं कोण बोललं? पाहा व्हीडिओ

Hardik Pandya Viral Video : हार्दिक पंड्या चाहत्यांमधून स्वत:ची सुटका करत कारच्या दिशेने जात होता. हार्दिकची पाठ फिरताच मागून कुणीतरी "भाडमे जाओ" असं म्हटलं. पाहा व्हायरल व्हीडिओ.

Hardik Pandya : भाड में जाओ.., हार्दिकला माहिकासमोर असं कोण बोललं? पाहा व्हीडिओ
Team India Hardik Pandya
Image Credit source: PTI
| Updated on: Dec 25, 2025 | 8:53 PM

टीम इंडियाचा अनुभवी ऑलराउंडर हार्दिक पंड्या याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात नुकत्याच झालेल्या टी 20i मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली. भारताने ही मालिका 3-1 अशा फरकाने जिंकली. हार्दिकने भारताला मालिका जिंकुन देण्यात प्रमुख भूमिका बजावली. हार्दिकने या मालिकेदरम्यान 2 हजार टी 20i धावा पूर्ण केल्या. तसेच हार्दिकने 100 टी 20i विकेट्सही पूर्ण केल्या. हार्दिकने भारतासाठी या मालिकेत बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही आघाड्यांवर उल्लेखनीय कामगिरी केली. टीम इंडिया आता थेट 11 जानेवारीपासून एक्शन मोडमध्ये असणार आहे. अशात आता भारताचा ऑलराउंडर पर्सनल लाईफमुळे चर्चेत आला आहे.

हार्दिक त्याच्या पर्सनल लाईफमुळे कायम चर्चेत असतो. हार्दिकचा ख्रिसमसच्या दिवशी एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. हार्दिक या व्हीडिओत त्याची गर्लफ्रेंड महिका शर्मा हीच्यासोबत दिसत आहे. हार्दिक आणि महिका हे दोघे ख्रिसमस डिनरसाठी एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते. हे दोघे इथून बाहेर पडले. तेव्हा हार्दिकला एका आव्हानचा सामना करावा लागला. तसेच यावेळेस हार्दिकला एका चाहत्याने “भाडमे जाओ”, असं म्हटल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल व्हीडिओमध्ये “भाडमे जाओ” असं म्हटल्याचं स्पष्टपणे ऐकायला येत आहे. मात्र ते हार्दिकलाच उल्लेखून म्हटलंय का? याला कोणताही ठोस आधार नाही.

नक्की काय झालं?

क्रिकेट चाहत्यांना खेळाडूंना सामन्याशिवाय कुठेच पाहता येत नाही. त्यामुळे आपल्या आवडत्या खेळाडूला एकदातरी भेटता यावं आणि 1 फोटो घेता यावा, अशी इच्छा प्रत्येक चाहत्याची असते.

हार्दिक आणि महिका हे दोघेही आल्याचं समजताच चाहत्यांनी आणि पॅपाराझीने रेस्टॉरंटबाहेर एकच गर्दी केली. चाहते हार्दिकची वाट पाहत होते. त्यानंतर हार्दिक आणि महिका बाहेर आले आणि कारच्या दिशेने निघाले. मात्र या दरम्यान चाहत्यांनी हार्दिकच्या चारही बाजूने गर्दी केली. चाहत्यांनी संधी मिळेल तशी हार्दिकसोबत सेल्फी घेतली. मात्र चाहते हार्दिकजवळ येत असल्याने क्रिकेटरने तिथून निघण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चाहते नाराज झाले.

हार्दिकचा व्हायरल व्हीडिओ

हार्दिक निघून जात असतानाच मागून कुणीतरी “भाडमे जा”, असं म्हटलं. मात्र हार्दिकने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तसेच “भाडमे जा” हे असं हार्दिकलाच म्हटलं का? याबाबत कोणतीही माहिती नाही. मात्र या सर्व प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.