IND vs NZ : टीम इंडियाचा स्टार बॅट्समन न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे-टी 20 सीरिजला मुकण्याची शक्यता

न्यूझीलंड भारत दौऱ्यावर येणार आहे. न्यूझीलंड या दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळणार आहे. टीम इंडियाचा खेळाडू या दोन्ही मालिकांना मुकण्याची शक्यता आहे.

IND vs NZ : टीम इंडियाचा स्टार बॅट्समन न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे-टी 20 सीरिजला मुकण्याची शक्यता
Image Credit source: BCCI
| Updated on: Jan 12, 2023 | 8:08 PM

मुंबई : टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल गेल्या काही काळापासून आऊट ऑफ फॉर्म आहे. केएलला त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता येत नाहीय. केएल श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर होता. मात्र एकदिवसीय मालिकेसाठी केएलची निवड करण्यात आली होती. केएलला पहिल्या वनडेतही फारची छाप सोडता आली नाही.

श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना संधी मिळाली नव्हती. या दोघांना विश्रांती दिल्याचंही म्हटलं जात होतं. मात्र केएल कोणत्या कारणामुळे टीममध्ये नव्हता, हे कुणालाच माहिती नव्हतं. या दरम्यान केएलच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळे केएलने स्वत: बीसीसीआयकडे विश्रांती मागितल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र हा दावाही खोडून काढण्यात आला.

आता पुन्हा केएलच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे केएल न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे.

केएलच्या लग्नाची आता पुन्हा सोशल मीडियावर चर्चा रंगू लागली आहे. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिकेदरम्यान रोहित बोहल्यावर चढणार असल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अनेकांना केएलच्या लग्नाची तारीखही माहित आहे.

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंडच्या भारत दौऱ्याची सुरुवात ही वनडे सीरिजने होणार आहे. मालिकेतील पहिला सामना 18 जानेवारीला आयोजित केला गेला आहे. दुसरा सामना 21 तर तिसरा सामना 24 जानेवारीला असणार आहे. या दरम्यान केएल आथियासोबत विवाहबद्ध होऊ शकतो.

यानंतर टी 20 मालिकेती पहिला सामना हा 27 जानेवारीला होणार आहे. त्यानंतर दुसरा आणि तिसरा सामना हा 29 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी पार पडेल. त्यामुळे केएल वनडे सीरिजमधून बाहेर राहिल किंवा टी 20 मालिकेतूनही विश्रांतीवर असेल.

न्यूझीलंडचा भारत दौरा

एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 18 जानेवारी, हैदराबाद

दुसरा सामना, 21 जानेवारी, रायपूर

तिसरा सामना, 24 जानेवारी, इंदूर

वरील तिन्ही सामन्यांना सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर यानंतर टी 20 मालिका पार पडणार आहे.

टी 20 मालिकेचं वेळापत्रक

पहिली मॅच, 27 जानेवारी, रांची

दुसरी मॅच, 29 जानेवारी, लखनऊ

तिसरी मॅच, 1 फेब्रुवारी, हैदराबाद