टीम इंडियातून बाहेर होताच सर्फराजचं विराटला आव्हान! असं रुप याआधीच पाहिलंच नसेल
Sarfaraz Khan : सर्फराज खान सध्या टीम इंडियाचा भाग नाही. सर्फराजला इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी संधी देण्यात आली नाही. सर्फराजने या दरम्यानच्या काळात फिटनेसवर कठोर मेहनत घेतली. सर्फराजचा हा नवा लूक पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळणाऱ्या आणि खोऱ्याने धावा करणाऱ्या सर्फराज खान याला निवड समितीने 2024 मध्ये इंग्लड विरुद्ध कसोटी पदार्पणाची संधी दिली. सर्फराजने पदार्पणातील मालिकेत बॅटिंग आणि फिल्डिंग दरम्यानच्या हुशारीने आपली निवड सार्थ ठरवली. मात्र सर्फराजला इंग्लंड दौऱ्यासाठी संधी देण्यात आली नाही. मात्र सर्फराजने न खचता कमबॅकसाठी जोरदार तयारी केली. सर्फराजने स्वत:वर मेहनत घेतली. सर्फराजने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमुळे खरंच हा सर्फराज आहे का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही.
सर्फराजला ओळखणं अवघड!
सर्फराजच्या खेळावर शंका घेण्याचं काहीही कारण नाही. मात्र सर्फराजला त्याच्या खेळात आणखी चांगला बदल करायचा असेल तर वजन कमी करावं, असा सल्ला अनेकदा देण्यात आला आहे. सर्फराजने हाच सल्ला चांगलाच मनावर घेत स्वत: मोठा बदल घडवून आणला आहे. सर्फराजने फिटनेसवर लक्ष केंद्रीत केलं आणि काही महिन्यात मोठा बदल घडवला. रिपोर्ट्सनुसार, सर्फराजने 2 महिन्यांमध्ये तब्बल 17 किलो वजन कमी केलं आहे. त्यामुळे सर्फराजने भारताचा माजी कसोटी फलंदाज फिटनेस फ्रीक विराट कोहली यालाच आव्हान दिलंय, असं म्हटलं जात आहे.
सर्फराजकडून फोटो पोस्ट
सर्फराजने इंस्टग्राम स्टोरीतून स्वत:चा एक फोटो पोस्ट केला आहे. सर्फराज या फोटोत जिममध्ये वर्कआऊट करताना दिसत आहे. सर्फराज या फोटोत एकदम स्लिम दिसत आहे.
सर्फराजला वजनामुळे अनेक टीकांचा सामना करावा लागला होता. मात्र सर्फरजाने काही महिन्यातच नेटकऱ्यांना चपराक लगावली आहे. सर्फराजने फिटनेसबाबत विराटलाच टक्कर दिलीय, असं आता नेटकरी म्हणू लागले आहेत. सर्फराजने त्याच्या या नव्या लूककडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सर्फराजकडून 2 महिन्यांत 17 किलो वजन कमी!
SARFARAZ KHAN HAS LOST 17KGS IN THE LAST 2 MONTHS. 🤯 pic.twitter.com/c9zbQQWors
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 21, 2025
इंग्लंडमध्ये कडक बॅटिंग
सर्फराजने इंग्लंड लायन्स विरुद्ध चमकदार कामगिरी केली होती. सर्फराजला इंडिया ए कडून इंग्लंड लायन्स विरुद्ध 2 अनऑफिशियल टेस्ट मॅचेसमध्ये संधी देण्यात आली होती. सर्फराजने पहिल्या सामन्यात 92 धावांची खेळी केली. तर इंट्रा स्क्वाड मॅचमध्ये सर्फराजने 76 चेंडूत 101 धावांची शतकी खेळी केली होती.
