Asia Cup 2025 : भारतीय संघात सर्वात भारी स्ट्राईक रेट कुणाचा? टॉपवर हा फलंदाज

Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात 15 खेळाडूंना संधी देण्यात आलीय. भारतीय संघातील या 15 पैकी टी 20I मध्ये स्ट्राईक रेटबाबत कोणता फलंदाज भारी? शुबमन गिल याचा स्ट्राईक रेट किती? जाणून घ्या.

Asia Cup 2025 : भारतीय संघात सर्वात भारी स्ट्राईक रेट कुणाचा?  टॉपवर हा फलंदाज
Team India Suryakumar Yadav
Image Credit source: suryakumar yadav x account
| Updated on: Aug 20, 2025 | 11:09 PM

यूएईत होणाऱ्या आशिया कप 2025 स्पर्धेसाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सूकता आहे. यूएईत 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. आशिया कप स्पर्धेसाठी 19 ऑगस्टला भारतीय संघ जाहीर करण्यात आला. त्यानुसार सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर शुबमन गिल उपकर्णधार म्हणून खेळणार आहे. तर यशस्वी जैस्वाल आणि श्रेयस अय्यर या दोघांना डच्चू देण्यात आला आहे. टी 20I फॉर्मेटमध्ये कायम फलंदाजांचा स्ट्राईक रेट पाहिला जातो. त्यामुळे या स्पर्धेसाठी संधी मिळालेल्या भारतीय फलंदाजापैकी सर्वोत्तम स्ट्राईक रेट कुणाचा आहे? हे जाणून घेऊयात.

अभिषेक शर्मा नंबर 1

भारतीय संघाकडून टी 20I मध्ये सर्वोच्च स्ट्राईक रेटचा विक्रम हा ओपनर अभिषेक शर्मा याच्या नावावर आहे. अभिषेक भारतासाठी ओपनिंग करतो. अपवाद वगळता अभिषेकने भारताला बहुतांश सामन्यात स्फोटक सुरुवात करुन दिली आहे. अभिषेकने 17 टी 20I सामन्यांमध्ये 535 धावा केल्या आहेत. अभिषेकने 193.85 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. या यादीत दुसऱ्या स्थानी सूर्यकुमार यादव विराजमान आहे. सूर्याने टी 20I कारकीर्दीत 167.08 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या आहेत.

स्टार फिनिशीर रिंकु सिंह याचा स्ट्राईक रेट हा 161.07 असा आहे. तर तिलक वर्मा याचा 25 सामन्यांनंतर 155.08 असा स्ट्राईक रेट आहे. तिलकने टी 20I कारकीर्दीत 749 धावा केल्या आहेत.

फलंदाज आणि स्ट्राईक रेट

अभिषेक शर्मा – 193.85
सूर्यकुमार यादव – 167.08
रिंकू सिंह – 161.07
तिलक वर्मा – 155.08
संजू सॅमसन – 152.39
जितेश शर्मा – 147.06
हार्दिक पंड्या – 141.68
शिवम दुबे – 140.11
शुबमन गिल – 139.28

शुबमनचा ‘एव्हरेज’ स्ट्राईक रेट

शुबमन गिल याचा स्ट्राईक रेट इतर फलंदाजांच्या तुलनेत फार काही खास नाही. गिलने 21 टी 20I सामन्यांमध्ये 30.42 च्या सरासरीने आणि 139.28 च्या स्ट्राईक रेटने 578 धावा केल्या आहेत. शुबमन स्ट्राईक रेटबाबत संजू सॅमसन, शिवम दुबे, हार्दिक पंड्या आणि जितेश शर्मा यांच्याही मागे आहे.

टीम इंडियाचा पहिला सामना केव्हा?

दरम्यान आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाचा अ गटात समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघ आशिया कप मोहिमेतील आपला पहिला सामना 10 सप्टेंबरला खेळणार आहे. हा सामना यूएई विरुद्ध होणार आहे. दुसर्‍या सामन्यात टीम इंडिया 14 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे. तर भारताचा साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना हा ओमान विरुद्ध होणार आहे. हा सामना 19 सप्टेंबरला होणार आहे.