Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2024 : रोहित शर्माचा 29 वा सिक्स खूप किंमती असेल, जाणून घ्या हा काय विषय आहे?

T20 World Cup 2024 : रोहित शर्माने व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये अनेक मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. यंदाच्या T20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माचा 29 वा सिक्स खूप खास असेल. रोहित शर्मा IPL 2024 खेळून T20 वर्ल्ड कपसाठी अमेरिकेला गेलाय.

T20 World Cup 2024 : रोहित शर्माचा 29 वा सिक्स खूप किंमती असेल, जाणून घ्या हा काय विषय आहे?
Rohit Sharma Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: May 28, 2024 | 2:07 PM

T20 वर्ल्ड कप जिंकण्याच्या उद्देशाने रोहित शर्मा अमेरिकेला पोहोचलाय. वर्ल्ड कप विजय शक्य करण्यासाठी रोहित शर्मासमोर दोनच मार्ग आहेत. एक म्हणजे स्वत: शानदार प्रदर्शन करणं. दुसरं म्हणजे टीमला चांगल्या पद्धतीने लीड करणं. सगळ्या टीमकडून उत्तम परफॉर्मन्स काढून घेणं. या दोन रोलशिवाय रोहित शर्मासमोर आणखी एक आव्हान असेल. हे आव्हान आहे 29 वा षटकार मारण्याच. तुम्ही म्हणाल भारतीय कर्णधाराशी संबंधित का विषय काय आहे?. याचा संबंध T20 वर्ल्ड कपमधील सर्वाधिक सिक्सशी आहे.

रोहित शर्मा IPL 2024 खेळून T20 वर्ल्ड कपसाठी अमेरिकेला गेलाय. IPL 2024 मध्ये त्याने आपला प्रवास 23 सिक्सनी संपवला. पण T20 वर्ल्ड कपमध्ये रोहितला 23 नाही, 29 सिक्सची गरज आहे. रोहितने जर 29 वा सिक्स मारले, तर तो T20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वाधिक सिक्स मारणारा फलंदाज बनेल.

रोहित या शर्यतीत कुठे आहे?

T20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने 33 सामन्यात 31 डावात 63 सिक्स मारलेत. रोहित शर्मा या बाबतीत ख्रिस गेल नंतर दुसऱ्या स्थानावर आहे. रोहितचे 39 सामन्यात 36 डावात 35 सिक्स आहेत. म्हणजे तो ख्रिस गेलचा विक्रम मोडण्यापासून 29 सिक्स दूर आहे.

ICC इवेंटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनेल

रोहित शर्माने T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये 29 सिक्स मारले, तर यूनिवर्स बॉस ख्रिस गेलचा रेकॉर्ड तुटेल. म्हणजे T20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर करेल. रोहितने 29 सिक्स लगावल्यानंतर विराट कोहलीनंतर ICC इवेंटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज बनेल.

रोहितची स्पर्धा कोणाबरोबर?

ख्रिस गेल आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाही. रोहितला फक्त 29 सिक्सच अंतर मिटवायच आहे. रोहितची या बाबतीत इंग्लंडच्या जोस बटलरशी स्पर्धा आहे. बटलरच्या नावावर 27 मॅचच्या 27 इनिंगमध्ये 33 सिक्स आहेत. तो रोहितच्या मागे आहे.

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.