
मुंबई | टीम इंडियाचा स्टार बॅट्समन विराट कोहली याने क्रिकेटच्या मैदानात आतापर्यंत असंख्य असे रेकॉर्ड केले आहेत. विराट कोहलीने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला अनेकदा विजयी केलं आहे. विराटने आपल्या तुफान कामगिरीने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. विराट कोहली याच मैदानातील कामगिरी, त्याची पर्सनलिटी, त्याची खेळण्याची स्टाईल या आणि अशा अनेक बाबी त्याच्या चाहत्यांना भावतात. विराटला पाहण्यासाठी चाहते हे स्टेडियमध्ये गर्दी करत असतात. विराटचे सोशल मीडियावरही कोटींच्या घरात चाहते आहेत. विराटची कोणतीही सोशल मीडिया पोस्ट काही मिनिटात व्हायरल होते. विराट फेसबूक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रीय असतो.
विराट कोहली क्रिकेट, जाहिराती व्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून खोऱ्याने कमाई करतो. विराट कोहलीची इंस्टाग्रामद्वारे होणारी कमाई ही कोटींच्या घरात आहे. विराट कोहली एक इंस्टाग्राम पोस्ट करण्यासाठी सर्वाधिक पैसे आकारतो. 2021 च्या होपर इंस्टाग्राम रिच लिस्टनसार, विराट कोहली इंस्टाग्राम पोस्टसाठी सर्वाधिक पैसे घेण्याच्या यादीत जगात 19 वा क्रमांकावर आहे. विराट कोहली याने आतापर्यंत इंस्टाग्राम पोस्ट करुन बक्कळ कमाई केली आहे. विराट कोहली एक इंस्टाग्राम पोस्ट करण्यासाठी जवळपास 5 कोटी रुपये घेतो.
बीसीसीआयने मार्च 2023 मध्ये वार्षिक करार जाहीर केला. बीसीसीआयच्या या वार्षिक करारात विराट कोहली हा ए प्लस या कॅटेगरीत आहे. या ए प्लस कॅटेगरीनुसार बीसीसीआयकडून विराटला ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 चा कालावधीसाठी 7 कोटी रुपये मिळणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला विराटला एका इंस्टाग्राम पोस्टमधून 11.45 कोटी मिळते. म्हणजेच विराट कोहली याची क्रिकेटपेक्षा इंस्टाग्रामच्या माध्यमातून कित्येक पट कमाई होतेय.
विराटची इंस्टाग्राम कमाई
Virat Kohli’s Instagram earnings per post (Hopper HQ):
– 11.45cr. pic.twitter.com/XLnm3H6fiL
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 11, 2023
विराट फक्त क्रिकेटच्या आकड्यांमध्येच टॉपवर आहे, अशातला भाग नाही. विराटचे इंस्टाग्रामवरही बेसुमार फॉलोवर्स आहेत. विराट भारतात इंस्टाग्राम फॉलोवर्सबाबत नंबर वन आहे. विराटचे इंस्टाग्रामवर तब्बल 177 मिलियन फॉलोवर्स आहेत. विराटनंतर अभिनेत्री प्रियांका चोपडा हीचा नंबर लागतो. जगातील टॉप 50 मध्ये इंस्टाग्राम कमाईबाबत भारतातील विराट आणि प्रियांका चोपडा या दोघांचाच समावेश आहे. प्रियांका चोपडा एका पोस्टसाठी 3 कोटी रुपये घेते.