
टीम इंडिया सध्या आशिया कप स्पर्धेसाठी तयारी करत आहेत. टीम इंडिया काही महिन्यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात वनडे आणि टी 20I मालिका खेळणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली ही अनुभवी जोडी टी 20I आणि टेस्टमधील निवृत्तीनंतर याच मालिकेतून पुन्हा एकदा कमबॅक करणार आहेत. उभयसंघात 3 एकदिवसीय आणि 5 टी 20I सामने होणार आहेत. या दौऱ्याआधीच भारतामुळे ऑस्ट्रेलियाला तगडा फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती दिली आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही मालिकांसाठी इंडियन फॅन झोनच्या सर्व तिकीटांची विक्री झाली आहे. तसेच सिडनी आणि राजधानी कॅनबेरा येथे होणार्या सामन्यांच्या पब्लिक तिकीटांची आगाऊ बूकींग (Advance Ticket Booking) झाली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाला फायदा झाला आहे.
टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेने होणार आहे. एकदिवसीय कर्णधार या नात्याने रोहित शर्मा या मालिकेत भारताचं नेतृत्व करणार आहे. तसेच विराट कोहली याचंही कमबॅक होणार आहे. क्रिकेट चाहते रोहित आणि विराटला पाहण्यासाठी उत्सूक आहेत. रोहित-विराटमुळेही तिकीट विक्रीत वाढ झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
या मालिकेची सुरुवात पर्थमधून होत आहे. या दौऱ्यातील सर्व सामने हे एकूण 8 ठिकाणी होणार आहेत. या आठही ठिकाणी इंडियन फॅन झोनच्या तिकीटांची विक्री झाली आहे. याबाबतची माहिती ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे अधिकारी जोएल मॉरिसन यांनी दिली.
पहिला सामना, 19 ऑक्टोबर, पर्थ
दुसरा सामना, 23 ऑक्टोबर, एडलेड
तिसरा आणि अंतिम सामना, 25 ऑक्टोबर, सिडनी
“ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया यांच्यातील सामने 8 ठिकाणी होणार आहेत. या आठही ठिकाणी इंडियन्स फॅन्स झोनच्या तिकीटांची विक्री झाली आहे. त्यामुळे आम्ही फार आनंदी आहोत. या मालिकेत क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम संघात लढत होणार आहे. क्रिकेट चाहते या मालिकांसाठी उत्सूक आहेत”, असं ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या अधिकाऱ्याने म्हटलं.
पहिला सामना, 29 ऑक्टोबर, मानुका ओव्हल, कॅनबेरा
दुसरा सामना, 31 ऑक्टोबर, मेलबर्न
तिसरा सामना, 2 नोव्हेंबर, होबार्ट
चौथा सामना, 6 नोव्हेंबर, गोल्ड कोस्ट
पाचवा सामना, 8 नोव्हेंबर,ब्रिस्बेन
दरम्यान टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सांगता टी 20i मालिकेने होणार आहे. या मालिकेचं आयोजन हे 29 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं आहे.