इरफान पठाणच्या पत्नीचा खरा चेहरा अखेर जगासमोर, फोटो तुफान व्हायरल

Irfan Pathan and Safa Baig Irfan Pathan and Safa Baig : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर इरफान पठाण याने अखेर आपल्या पत्नीचा चेहरा सर्व जगाला दाखवला आहे. कारण याआधी प्रत्येक फोटोमध्ये चेहरा लपवलेला असायचा. मात्र आपल्या लग्नाच्या वाढदिवशी त्याने पत्नीचा चेहरा दिसणारा फोटो शेअर केला आहे.

इरफान पठाणच्या पत्नीचा खरा चेहरा अखेर जगासमोर, फोटो तुफान व्हायरल
पहिल्यांदाच सर्वांनी इरफान पठाणच्या पत्नीचा चेहरा न झाकलेला फोटो पाहिला. यावर अभिनेता रितेश देशमुख याने फोटोला रिप्लाय देताना, सफा बेग आणि इरफान पठान यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Image Credit source: Facebook : Irfan Pathan
| Updated on: Feb 04, 2024 | 3:25 PM

मुंबई : टीम इंडियाचा माजी खेळाडू इरफान पठाण निवृत्त झाला असला तरी कॉमेट्रीमुळे कायम चर्चेत असलेला पाहायला मिळतो. इरफान पठाणसाठी आज खास दिवस आहे. कारण इरफानच्या लग्नाचा आठवा वाढदिवस आहे. लग्नाच्या वाढदिवशी त्याने आपल्या पत्नीचा फोटो पोस्टच केलाय. याआधीही अनेक फोटो पोस्ट केलेत मात्र त्यामध्ये तिचा चेहरा कोणाला दिसला नाही. कारण तिने बुरखा घातला नसून पहिल्यांदाचा इरफानने असा फोटो पोस्ट केला आहे.

इरफान पठाण याची पोस्ट

इरफान पठाण याच्या पत्नीचे नाव सफा बेग आहे. 2016 साली इरफान आणि सफा यांचा निकाह झाला होता. लग्न झाल्यावर इरफान पठाण याने आपल्या पत्नीचे अनेक फोटो पोस्ट केले होते. मात्र त्यामध्ये सफा बेग हिचा चेहरा कधी दिसला नाही. कारण अनेकवेळा बुरखा तर चेहऱ्यावर हात ठेवलेला असायचा. इरफानची पत्नी सफा बेग सुंदर आहे, इरफानच्या चाहत्यांनी कमेंट करत चेहरा कधी दाखवणार असं विचारलं होतं. अखेर लग्नाच्या आठव्या वाढदिवशी तिची ही इच्छा पूर्ण झाली आहे.

मुलांसाठी मूड बूस्टर, कॉमेडियन मित्र आणि आई अशा अनेक भूमिका पार पाडल्या आहेस. या सुंदर प्रवासामध्ये तु माझी पत्नी म्हणून मला खूप आनंदी आहे. लग्नाच्या 8 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, असं इरफान पठाण याने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

इरफान पठाण आणि त्याची पत्नी सफा बेग यांना चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. काहींनी तर सफा बेग हिची बॉलिवुड अभिनेत्रींसोबत तुलना केली आहे. इरफान पठाणची पत्नीचा चेहरा गुढ असल्यासारखाा होता. कारण इरफान दोघांचे फोटो शेअर करायचा पण चेहरा काही दिसायचा नाही. त्यामुळे चाहते कायम त्याला कमेंटमध्ये चेहरा कधी दाखवणार असं विचारात राहायचे.  इरफाननेही आता चाहत्यांची इच्छा पूर्ण केली आहे.