IND vs ENG | दुसरा दिवसही टीम इंडियाचाच, इंग्लंड विरुद्ध 255 धावांची आघाडी

india vs england 5th test day 2 highlights | टीम इंडियाने पाचव्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ आपल्या नावावर केला आहे. टीम इंडियाच्या फलंदाजीने इंग्लंडला रडकुंडीला आणलं. आता तिसरा दिवस निर्णायक ठरणार आहे.

IND vs ENG | दुसरा दिवसही टीम इंडियाचाच, इंग्लंड विरुद्ध 255 धावांची आघाडी
Follow us
| Updated on: Mar 08, 2024 | 5:44 PM

धर्मशाला | टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटी साम्यावर घट्ट पकड मिळवली आहे. टीम इंडियाने आपल्या पहिल्या डावात दुसऱ्या दिवसाचा खेळसंपेपर्यंत 8 विकेट्स गमावून 473 धावा केल्या आहेत. टीम इंडियाने यासह 255 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांनी शतकी खेळी साकारली. तर सरफराज खान आणि डेब्यूटंट देवदत्त पडीक्कल या युवा खेळाडूंना अर्धशतक ठोकलं. इंग्लंडने कमॅबक करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी इंग्लंडला रडकुंडीला आणलं. त्यामुळे आता टीम इंडिया पाचवा सामना जिंकून तिसऱ्याच दिवशी विजयी चौकार लगावणार का, अशी चर्चा आता रंगली आहे.

टीम इंडियाची बॅटिंग

कुलदीप यादव याच्या 5, आर अश्विन याच्या 4 आणि रविंद्र जडेजाच्या 1 विकेटच्या मदतीने टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या डावात पहिल्याच दिवशी 218 धावांवर ऑलआऊट केलं. त्यांनंतर पहिल्या दिवसापर्यंत टीम इंडियाने 1 विकेट गमावून 135 धावा केल्या. तर दुसऱ्या दिवसाचा खेळसंपेपर्यंत टीम इंडियाने 473 धावांपर्यंत मजल मारली आहे. तसेच नवव्या विकेटसाठी कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी 44 धावांची नाबाद भागादारी केली आहे.

हे सुद्धा वाचा

रोहित-शुबमन या दोघांनी दुसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात केली. टीम इंडिया 83 धावांनी पिछाडीवर होती. तिथून पुढे पहिल्या सत्रात टीम इंडियाने एकही विकेट गमावली नाही. या दरम्यान रोहित आणि शुबमन या दोघांनी शतक ठोकलं. मात्र लंचनंतर दुसऱ्या सत्रात टीम इंडियाने 2 विकेट्स झटपट गमावल्या. रोहित 103 आणि शुबमन 110 धावा करुन झटपट आऊट झाले. त्यानंतर सरफराज आणि डेब्यूटंट देवदत्त पडीक्कल या युवा जोडीने वैयक्तिक अर्धशतक झळकावत टीम इंडियाचा डाव सावरला. मात्र त्यानंतर हे दोघेही आऊट झाले.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला

सरफराजने 56 आणि देवदत्तने 65 धावा केल्या. त्यानंतर टीम इंडियाने झटपट 3 विकेट्स गमावल्या. मात्र त्यानंतर जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव या दोघांनी टीम इंडियाला पुन्हा स्थिरता दिली. दोघेही नाबाद परतले. कुलदीपने 27 आणि बुमराहने 19 धावा केल्या. आता क्रिकेट चाहत्यांना तिसऱ्या दिवसाच्या खेळाची प्रतिक्षा आहे.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, देवदत्त पडीक्कल, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वुड, जेम्स अँडरसन आणि शोएब बशीर.

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.