IND vs ENG : दुसऱ्या कसोटीत भारताचं कमबॅक जबरदस्त कमबॅक, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये झाला फायदा

भारताने इंग्लंड विरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकत मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे. आता पुढील तीन सामने निर्णायक असणार आहेत. पण दुसरा सामना जिंकताच टीम इंडियाच्या विजयी टक्केवारीत फरक पडला आहे. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत जबरदस्त फायदा झाला आहे.

IND vs ENG : दुसऱ्या कसोटीत भारताचं कमबॅक जबरदस्त कमबॅक, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये झाला फायदा
IND vs ENG : दुसऱ्या कसोटी इंग्लंडला मात देताच भारताची मोठी उसळी, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत असा पडला फरक
| Updated on: Feb 05, 2024 | 2:46 PM

मुंबई : पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने अखेर कमबॅक केलं आहे. पहिला कसोटी सामना गमवल्यानंतर टीम इंडियावर दडपण आलं होतं. त्यामुळे काहीही करून दुसऱ्या कसोटी सामन्यात कमबॅक करण्याचं आव्हान होतं. टीम इंडियाने इंग्लंडसमोर विजयासाठी 398 धावांचं आव्हान दिलं होतं. पण इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात 292 धावाच करू शकला. टीम इंडियाने इंग्लंडवर 106 धावांनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशनिप 2025 मध्ये जबरदस्त फायदा झाला आहे. पाचव्या स्थानावरून थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. अजून टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध तीन कसोटी सामने खेळायचे आहे. यात टीम इंडियाने विजय मिळवला तर अंतिम फेरीचा मार्ग सुकर होणार आहे. दरम्यान इंग्लंडला या पराभवचा मोठा दणका बसला आहे. अंतिम फेरीची वाट जवळपास बिकट झाल्याचं दिसून येत आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत टीम इंडियाने 52.77 च्या विजयी टक्केवारीसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. 55 टक्के विजयी टक्केवारीसह ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर विराजमान आहे. तर दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड आणि बांगलादेश 50 टक्के विजयी टक्केवारीसह संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर आहेत. 36.66 विजयी टक्केवारीसह पाकिस्तान सहाव्या, 33.33 विजयी टक्केवारीसह वेस्ट इंडिज सातव्या, 25 विजयी टक्केवारीह इंग्लंड आठव्या स्थानावर आहे. तर श्रीलंकन संघ सर्वात शेवटी आहे.

टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम फेरीचा मार्ग सुकर करायचा असेल तर उर्वरित तीन सामन्यात विजय मिळवावा लागेल. कारण न्यूझीलंडचा संघ तीन सामन्यासाठी भारतात येईल. त्यानंतर टीम इंडियाला पाच सामन्यांच्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियात जायचं आहे. त्या ठिकाणी विजयी टक्केवारी शाबूत ठेवणं कठीण आहे. त्यामुळे भारताचं भविष्य आता न्यूझीलंड आणि इंग्लंड याच दौऱ्यावर अवलंबून आहे. भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीला, चौथा कसोटी सामना 23 फेब्रुवारी आणि पाचवा कसोटी सामना 7 मार्चला होणार आहे.