Cheteshwar Pujara ची निवृत्तीनंतर पहिली प्रतिक्रिया, माजी कर्णधार धोनीबाबत असं म्हणाला, पाहा व्हीडिओ

Cheteshwar Pujara Retirement : भारतासाठी अनेकदा मैदानात घट्ट पाय रोवून विजय मिळवून देणाऱ्या चेतेश्वर पुजारा याने रविवारी 24 ऑगस्टला क्रिकेटला कायमचा अलविदा केला. त्यानंतर पुजाराने काय म्हटलं? जाणून घ्या.

Cheteshwar Pujara ची निवृत्तीनंतर पहिली प्रतिक्रिया, माजी कर्णधार धोनीबाबत असं म्हणाला, पाहा व्हीडिओ
MS Dhoni and Cheteshwar Puajara
Image Credit source: Tv9 and PTI
| Updated on: Aug 24, 2025 | 8:15 PM

टीम इंडियाचा अनुभवी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा याने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. पुजाराने सोशल मीडियावर पोस्ट करत आपण निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. पुजारा गेल्या अनेक वर्षांपासून फक्त कसोटी क्रिकेटमध्येच खेळत होता. मात्र त्यातही पुजाराला निवड समितीने काही वर्ष संघात स्थान दिलं नाही. त्यामुळे पुजारा अनेक महिने संघापासून दूर होता. मात्र त्यानंतरही पुजाराने धीर सोडला नाही. पुजाराने आपण भारतासाठी कधीही खेळण्यासाठी तयार असल्याचं अनेकदा बोलून दाखवलं. मात्र पुजाराने अखेर अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. पुजाराने निवृत्तीनंतर पहिली प्रतिक्रिया दिली. पुजाराने निवृत्तीनंतर बोलताना काय म्हटलं? तसेच धोनीबाबत काय भाष्य केलं? जाणून घेऊयात.

सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या दिग्गजांसह खेळण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी सन्मानाची बाब असल्याचं पुजाराने म्हटलं. पुजाराने महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात कसोटी पदार्पण केलं. पुजाराने निवृत्तीनंतर प्रतिक्रिया देताना पदार्पणाचा उल्लेख केला.

पुजारा काय म्हणाला?

“मी 2010 साली माही भाईच्या (महेंद्रसिंह धोनी) नेतृत्वात पदार्पण केलं. मी पदार्पण केलं तेव्हा संघात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड,सौरव गांगुली, गौतम गंभीर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि अन्य दिग्गज होते. त्यामुळे माझ्यासाठी तेव्हा हे स्वप्नवत होतं. मी हरभजन सिंग, झहीर खान या सारख्या दिग्गजांना पाहून मोठा झालो. त्यामुळे माझ्यासाठी कारकीर्दीतील असंख्य क्षणापैकी तो क्षण अविस्मरणीय असा होता”, असं पुजाराने म्हटलं. पुजाराने पीटीआय या वृत्तसंस्थेसह बोलताना ही प्रतिक्रिया दिली.

चेतेश्वर पुजारा याची क्रिकेट कारकीर्द

चेतेश्वर पुजारा भारताकडून 5 एकदिवसीय सामने खेळला. तर पुजाराला एकदाही टी 20i सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र पुजाराने कसोटी क्रिकेटमध्ये माजी कर्णधार आणि विकेटकीपर राहुल द्रविड याचा वारसा यशस्वीरित्या चालवला.

पुजाराची निवृत्तीनंतर पहिली प्रतिक्रिया

पुजाराने कसोटी पदार्पणाच्या अवघ्या काही वर्षात आपली छाप सोडली. त्यामुळे द्रविडनंतर पुजाराकडे संकटमोचक म्हणून पाहिलं जाऊ लागलं. पुजाराने चाहत्यांच्या हा विश्वास वारंवार सार्थ ठरवला आणि अनेक सामन्यांमध्ये भारताला विजयी करण्यात मोलाची भूमिका बजावली. पुजाराने भारताचं 100 पेक्षा अधिक सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं. पुजारा भारतासाठी 103 कसोटी सामने खेळला.