
नवी दिल्ली : टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. आज टीम इंडिया वेस्ट इंडिजमध्ये पहिला सामना खेळणार आहे. बारबाडॉसमध्ये टीमने जोरदार नेट प्रॅक्टिस केली. टेस्ट सीरीजच्या पहिल्या मॅचसाठी टीम इंडिया डॉमिनिकाला रवाना होणार आहे. त्याआधी बारबाडॉसमध्ये टीम इंडिया एक मॅच खेळणार आहे. टीम इंडिया या मॅचमधून 3 प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करेल. सर्वप्रथम पहिला प्रश्न ओपनिंगचा आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये ओपनिंगला कोण येणार?. सध्या तरी कॅप्टन रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही दोन नाव दिसतायत. पण ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल हे दोघे सुद्धा टीममध्ये आहेत. हे दोन्ही प्लेयर ओपनिंगला येतात.
या मॅचमधून 3 प्रश्नांची उत्तर मिळणार
दुसरा प्रश्न चेतेश्वर पुजाराशी संबंधित आहे. पुजाराची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीममध्ये निवड झालेली नाही. आता तीन नंबरवर कोण खेळणार? हा प्रश्न आहे. टीम इंडियात या जागेसाठी यशस्वी जैस्वालची निवड केली आहे. टीम मॅनेजमेंट या जागेवर यशस्वी जैस्वाललाच संधी देणार की अजून कोणाला ते लवकरच स्पष्ट होईल.
म्हणूनच हा सामना महत्वाचा
टीम कॉम्बिनेशन काय असणार? हा तिसरा महत्वाचा प्रश्न आहे. संतुलन योग्य असेल, त्याचवेळी एखादी टीम जिंकते. टीम इंडियाला सुद्धा परिस्थिती आणि खेळाडूंचा फॉर्म पाहून टीम निवडावी लागेल. म्हणूनच हा सराव सामना महत्वाचा असेल.
हे 8 खेळाडू कोण असतील?
टीम इंडिया आज बारबाडॉसमध्ये सराव सामना खेळणार आहे. या मॅचमध्ये भारतीय खेळाडू असतीलच. पण सोबत वेस्ट इंडिजचे 8 प्लेयर असतील. तुम्हाला प्रश्न पडेल, हे 8 खेळाडू कोण असतील?. या वॉर्मअप मॅचमधून वेस्ट इंडिजमधील खेळपट्टयांचा सराव होईल.
किती दिवसांची मॅच?
ही वॉर्म अप मॅच दोन दिवसांची असेल. 5-6 जुलैला ही वॉर्म अप मॅच खेळली जाईल. भारतीय खेळाडूच आपसात दोन टीम पाडून खेळतील. दोन्ही टीम्सची संख्या पूर्ण करण्यासाठी वेस्ट इंडिज बोर्डाने 8 खेळाडू दिले आहेत. वेस्ट इंडिजचे हे 8 प्लेयर फर्स्ट क्लास क्रिकेटर आहेत. त्यांच्यापैकी एकानेही आंतरराष्ट्री सामना खेळलेला नाहीय.