
टीम इंडिया 2024 या वर्षाचा अविस्मरणीय शेवट करण्यात अपयशी ठरली, त्यामुळे टीम इंडियाचं वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं. न्यूझीलंडने भारताचा मायदेशात 0-3 अशा फरकाने कसोटी मालिकेत धुव्वा उडवला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेत 3-1 ने पराभूत केलं. ऑस्ट्रेलियाने यासह 10 वर्षांनंतर बीजीटी ट्रॉफी जिंकली. टीम इंडिया आता 2025 या नववर्षात नव्याने सुरुवात करण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडियाची युवा ब्रिगेड सूर्यकुमार यादव याच्या नेतृ्त्वात मायदेशात टी 20I मालिका खेळणार आहे.
इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 22 जानेवारीपासून 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेला सुरुवात होत आहे. उभयसंघातील सलामीचा सामना हा कोलकातामधील ईडन गार्डन या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्यानिमित्ताने आपण टीम इंडियाची ईडन गार्डनमध्ये टी 20 क्रिकेटमध्ये कशी कामगिरी राहिली आहे, हे जाणून घेऊयात.
टीम इंडियाने 2011 पासून ईडन गार्डनमध्ये एकूण 7 सामने खेळले आहेत. टीम इंडियाला या ईडन गार्डनमधील पहिल्या टी 20 सामन्यात पराभूत व्हावं लागलं. इंग्लंडनेच 2011 साली भारताला पराभूत केलं होतं. मात्र त्यानंतर टीम इंडियाने खेळलेल्या सहाही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे आता इंग्लंड पुन्हा एकदा पराभूत करत टीम इंडियाचा विजय रथ रोखणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
विरुद्ध इंग्लंड, 2011, भारताचा पराभव
विरुद्ध पाकिस्तान, 2016, भारताचा विजय
विरुद्ध विंडीज, 2018, भारताचा विजय
विरुद्ध न्यूझीलंड, 2021, भारताचा विजय
विरुद्ध विंडीज, 2022, भारताचा विजय
विरुद्ध विंडीज, 2022, भारताचा विजय
विरुद्ध विंडीज, 2022, भारताचा विजय
पहिल्या टी 20i सामन्यासाठी इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जॉस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक (उपकर्णधार), फिल सॉल्ट, बेन डकेट, लियाम लिविंगस्टोन, जेकब बेथल, जेमी ओव्हरटन, गस एटकीन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड.
इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि वॉशिंगटन सुंदर.