AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mohammed shami | टेन्शन वाढलं, मोहम्मद शमी आणि ऋषभ पंतच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट

Mohammed shami | मागच्यावर्षी झालेल्या वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये मोहम्मद शमीने जबरदस्त गोलंदाजी केली होती. त्याने आपल्या गोलंदाजीने प्रतिस्पर्धी टीमची वाट लावली होती. या टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो गोलंदाज ठरला होता. पण आता तोच मोहम्मद शमी दुखापतीने त्रस्त आहे.

Mohammed shami | टेन्शन वाढलं, मोहम्मद शमी आणि ऋषभ पंतच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट
Mohammed shami Image Credit source: AFP
| Updated on: Jan 20, 2024 | 8:22 AM
Share

Mohammed shami | वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये मोहम्मद शमीने कमालीची गोलंदाजी केली. सध्या टीम इंडियाचा हा वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे संघाच्या बाहेर आहे. वर्ल्ड कप दरम्यान शमीच्या पायाला दुखापत झाली होती. वर्ल्ड कपनंतर शमी एकही सामना खेळलेला नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी सुद्धा त्याची टीम इंडियात निवड होऊ शकली नाही. सध्या शमी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीमधून बाहेर पडण्यासाठी मेहनत घेत आहेत. पण शमीला आपल्या दुखापतीवर उपचारासाठी परदेशात जाव लागू शकत. क्रिकबजच्या रिपोर्ट्नुसार, शमी स्पेशलिस्ट डॉक्टरांना भेटण्यासाठी लंडनला जाऊ शकतो. शमीच नाही वर्षभरापेक्षापण अधिक काळापासून टीम बाहेर असलेला ऋषभ पंत सुद्धा लंडनला जाऊ शकतो.

वर्ल्ड कपमध्ये शमीने आपल्या गोलंदाजीने प्रतिस्पर्धी टीमची दाणादाण उडवून दिली होती. या टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो गोलंदाज ठरला होता. तो 7 सामनेच खेळला, पण या सामन्यांमध्ये त्याने एकूण 24 विकेट काढले. सुरुवातीच्या चार सामन्यांमध्ये त्याचा टीममध्ये समावेश करण्यात आला नव्हता. हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यानंतर त्याला संधी मिळाली. पण शमीने मागे वळून पाहिलं नाही. त्याने आपल्या गोलंदाजीने समोरच्या टीमची वाट लावून टाकली. या दरम्यान त्याला दुखापत सुद्धा झाली.

शमीला उपचारासाठी कुठे पाठवणार?

क्रिकबजच्या रिपोर्ट्नुसार एनसीएचे स्पोर्ट्स सायन्स हेड नीतिन पटेल सुद्धा शमीसोबत लंडनला जाऊ शकतात. पटेल यांनी गुरुवारी शमीला गोलंदाजी करताना होणारी दुखापत तपासली. त्यानंतर शमीला लंडनच्या स्पेशलिस्टला दाखवण्याचा निर्णय घेतला. शमी आणि पटेल कधी लंडनला रवाना होणार? या बद्दल काही निश्चित माहिती नाहीय. पण शमी आपल्या दुखापतीमधून सावरण्याचे उपचार घेण्यासाठी लंडनला जाऊ शकतो.

ऋषभ पंतबद्दल काय अपडेट?

वेबसाइटच्या रिपोर्ट्नुसार बीसीसीआय पंतला सुद्धा लवकरच लंडनला पाठवू शकते. 30 डिसेंबर 2022 रोजी पंत दिल्लीहून रुडकी येथील आपल्या घरी जात असताना त्याच्या कारला भीषण अपघात झाला होता. या अपघातात पंत गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला लिगामेंट इंजरी झाली होती. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. पंतबद्दल अशी बातमी होती की, तो अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 सीरीजद्वारे मैदानावर पुनरागमन करु शकतो, पण असं झालं नाही.

सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.