AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shubman Gill : शुबमन गिल मैदानाबाहेर खेळतोय सेकंड इनिंग, सारासोबतचा ‘तो’ फोटो व्हायरल

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर शुबमन गिल आणि सारा एकमेकांना डेट करतायेत का? सोशल मीडियावर तो फोटो व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांची एकच चर्चा सुरु झाली आहे.

Shubman Gill : शुबमन गिल मैदानाबाहेर खेळतोय सेकंड इनिंग, सारासोबतचा 'तो' फोटो व्हायरल
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 02, 2023 | 9:53 PM
Share

मुंबई : टीम इंडियाचा स्टार ओपनर बॅट्समन शुबमन गिल गेल्या काही दिवसांपासून धमाकेदार कामगिरी करतोय. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक, त्यानंतर वनडे आणि टी 20 सामन्यात शतक ठोकलं. शुबमनची क्रिकेटच्या मैदानातच चर्चा नाही, तर मैदानाबाहेरही एकच चर्चा आहे ती म्हणजे सारा अली खान आणि सारा तेंडुलकर यांच्यासोबत नाव जोडल्या गेल्याने. दोघांनी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना नकार दिला आहे. मात्र आता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झालाय. या फोटोमुळे पुन्हा शुबमन आणि सारा या दोघांनी चर्चा रंगली आहे.

शुबमन आणि सारा खान या दोघांचा फोटो एका यूझरने शेअर केला आहे. हा फोटो एअरपोर्टवरचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. फोटोत सारा आणि शुबमन सोबत बसलेले आहेत. दोघं एकमेकांसोबत बोलतायेत. या दोघांचा फोटो व्हायरल झाल्याने नक्कीच काही तरी सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

सारा आणि शुबमनचा फोटो आत्ताचा आहे की जुना, याबाबतही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या दोघांमध्ये नक्कीच काही तरी गॅटमॅट सुरु असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणनं आहे.

दरम्यान फक्त सारा अली खानच नाही, तर शुबमनचं सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हीच्यासोबतही नाव जोडलं गेलंय. शुबमनने न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये खणखणीत द्विशतक ठोकलं होतं. त्यानंतर सचिन इम्प्रेस होऊन शुबमनचा सारासोबत साखरपुडा ठरवल्याचे काही ट्विट व्हायरल झाले होते.

तसेच सोशल मीडियावर सचिन, शुबमन आणि सारा या तिघांच्या नावाने सोशल मीडियावर फोटो, मीम्स आणि भन्नाट विनोदी मीम्स व्हायरल झाले होते.

दरम्यान टीम इंडिया आता श्रीलंका आणि न्यूझीलंडला लोळवल्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध दोन हात करण्यासाठी सज्ज आहे. उभयसंघात कसोटी आणि वनडे सीरिज खेळवण्यात येणार आहे.

कसोटी मालिकेची सुरुवात 9 फेब्रुवारीपासून होणार आहे. या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये शुबमन गिल याचा समावेश करण्यात आला आहे.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिली कसोटी, 9-13 फेब्रुवारी, नागपूर

दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, नवी दिल्ली

तिसरी कसोटी, 1-5 मार्च, धर्मशाळा

चौथी कसोटी, 9-13 मार्च, अहमदाबाद

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

Follow Us
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप