नागपूर वनडे सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या सदस्याला पोलिसांनी पकडलं, झालं असं की… Watch Video

भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होत आहे. ही मालिका चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. या सामन्यात खऱ्या अर्थाने भारतीय संघाची लिटमस टेस्ट होणार आहे. पहिला वनडे सामना नागपूरमध्ये होणार आहे. तत्पूर्वी टीम इंडियाच्या एका सदस्याला पोलिसांनी पकडलं. त्याचं झालं असं की...

नागपूर वनडे सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या सदस्याला पोलिसांनी पकडलं, झालं असं की... Watch Video
| Updated on: Feb 04, 2025 | 3:15 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिका 6 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये होणार आहे. यासाठी टीम इंडियाचे सर्व सदस्या नागपूरला पोहोचले आहेत. भारताने टी20 मालिकेत इंग्लंडला 4-1 ने पराभूत केलं. त्यामुळे वनडे मालिकेत तशाच कामगिरीची अपेक्षा आहे. टीम इंडियाचा आक्रमक पवित्रा असला तरी यावेळी चेहरे वेगळे आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. नागपूर वनडे सामन्यात भारताच्या तयारी किती झाली आहे हे दिसून येईल. पण या सामन्यापूर्वीच टीम इंडियाच्या एका सदस्याला नागपूर पोलिसांनी पकडलं. त्याला पकडण्याचं कारण असं की तो टीम इंडियाच्या सदस्यांपासून वेगळा होता. हा सदस्य दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय संघाचा थ्रोडाउन स्पेशालिस्ट रघु होता. व्हायरल व्हिडीओत एक पोलीस कर्मचारी रघुला अडवताना दिसत आहे. पोलिसांनी तो कोणीतरी चाहता असल्याचं समजून त्याला अडवलं. रघु काही मिनिटं पोलिसांना समजवलं. थोड्या वेळाने जेव्हा पोलिसांनी त्याचं म्हणणं पटलं तेव्हा त्यांनी त्याला सोडून दिलं.

रघु हा भारतीय संघासोबत 2011 पासून आहे. रघुने 150 ते 155 किमी प्रतितास वेगाने चेंडू फेकण्यात माहिर आहे. रघुने या माध्यमातून विराट कोहली, एमएस धोनी, केएल राहुलसारख्या दिग्गज खेळाडूंना तयारी करण्यास मदत केली आहे. त्यामुळे रघुचं संघासोबत असणं खूपच महत्त्वाचं आहे. सामन्यापूर्वी खेळाडू रघुच्या स्पीडचा सामना करतात आणि पुढची तयारी करत असतात. इंग्लंडचा जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड हे गोलंदाजी 145 किमी प्रतितासाने चेंडू टाकण्याची ताकद ठेवतात. त्यामुळे या गोलंदाजांना सामना करताना रघुसोबत थ्रोडाऊन सराव खूपच महत्त्वाचा आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना 6 फेब्रुवारीला नागपूरमध्ये, दुसरा वनडे सामना 9 फेब्रुवारीला कटकमध्ये, तिसरा वनडे सामना 12 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये होणार आहे. भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांसाठी ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. या माध्यमातून चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी करता येणार आहे. दरम्यान, इंग्लंडचा संघ भारताच्या गटात नाही. भारताला साखळी फेरीत बांग्लादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडशी सामना करायचा आहे. त्यामुळे इंग्लंडशी गाठ उपांत्य किंवा अंतिम फेरीत पडू शकते.