रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया वर्ल्डकप जिंकणार? युवराज सिंग याच्या प्रश्नावर सेहवागने दिलं उत्तर

ODI World Cup 2023 : युवराज सिंग याने ट्विटरवर एक पोस्ट करत वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील टीमबाबत एक प्रश्न उपस्थित केला आहे. यावर वीरेंद्र सेहवाग याने जोरदार उत्तर दिलं आहे.

रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया वर्ल्डकप जिंकणार? युवराज सिंग याच्या प्रश्नावर सेहवागने दिलं उत्तर
रोहित शर्मा 2011 वर्ल्डकपची पुनरावृत्ती करणार? युवराज सिंग याने असा प्रश्न विचारताच सेहवाग म्हणाला की...
| Updated on: Sep 07, 2023 | 6:40 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचं आयोजन भारतात करण्यात आलं आहे. 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्डकप स्पर्धा सुरु होणार आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 15 खेळाडूंची घोषणाही करण्यात आली आहे. मात्र रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील संघ वनडे वर्ल्डकप जिंकणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. टीम इंडियाने 2011 मध्ये वनडे वर्ल्डकप जिंकला होता. वानखेडे स्टेडियमध्ये 28 वर्षानंतर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला होता. आता 12 वर्षानंतर या विजयाची पुनरावृत्ती करण्याची संधी टीम इंडियासमोर आहे. याबाबत आता युवराज सिंग याने टीम इंडियाच्या क्षमतेबाबत एक प्रश्न ट्विटरवर विचारला आहे. यावर माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने जोरदार उत्तर दिलं आहे. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध 8 ऑक्टोबरला आहे.

काय म्हणाला युवराज सिंग?

“आम्ही सर्व आयसीसी वर्ल्डकप 2023मध्ये 2011 ची पुनरावृत्ती व्हावी अशी आशा करतो. पण 2011 टीम इंडिया दबावात होती. 2023 मध्ये पुन्हा एकदा टीम इंडिया चांगल्या प्रदर्शनासाठी दबावात आहे. आपल्याकडे हे सर्व बदलण्यासाठी योग्य वेळ आहे का? आम्ही या दबावाचा उपयोग करू शकतो का?”, असं माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याने म्हंटलं आहे. 2011 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत युवराज सिंग याला प्लेयर ऑफ द टूर्नामेंट पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.

वीरेंद्र सेहवाग याने काय उत्तर दिलं?

माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने याला उत्तर दिलं आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, शुबमन गिल, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहसारखे खेळाडू दबावात झुकणार नाहीत. हा दबाव ते विरोधी संघांवर टाकतील, असं त्याने सांगितलं आहे. ‘दबावाबाबत बोलत असशील तर आम्ही दबाव घेणार नाही. तर देणार..चॅम्पियन सारखं…मागच्या 12 वर्षात यजमान संघाने वर्ल्डकप जिंकला आहे. 2011 मध्ये आपण जिंकलो, 2015 मध्ये ऑस्ट्रेलिया जिंकली, 2019 मध्ये इंग्लंड जिंकली, आता 2023 मध्ये आपण चांगली कामगिरी करू.’ असं वीरेंद्र सेहवाग म्हणाला.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.