AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 | फॉर्ममध्ये असलेल्या न्यूझीलंडला कस हरवायचं? रोहितला ‘या’ देशाने दिला प्लान

World Cup 2023 | वर्ल्ड कप 2023 मधील टीम इंडिया मोठा सामना खेळ्णार आहे. कारण टींम इंडियाप्रमाणे हीच टीम चालू वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक सामना जिंकतेय. कदाचित हा सामनाच वनडे वर्ल्ड कप 2023 मधील फायनलआधीचा रंगीत तालिम ठरु शकतो.

World Cup 2023 | फॉर्ममध्ये असलेल्या न्यूझीलंडला कस हरवायचं? रोहितला 'या' देशाने दिला प्लान
Team india ind vs nz odi world cup 2023Image Credit source: PTI
| Updated on: Oct 21, 2023 | 4:56 PM
Share

नवी दिल्ली : भारतात वनडे वर्ल्ड कप सुरु आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच जबरदस्त प्रदर्शन सुरु आहे. टीम इंडिया आतापर्यंत चार सामने खेळली असून चारही सामन्यात विजय मिळवलाय. टीम इंडियाचा आता पुढचा सामना आयसीसी स्पर्धेत सतत त्रास देणाऱ्या टीमसोबत आहे. वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडिया आपला पुढचा सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. याच टीमने आतापर्यंत बऱ्याचदा आयसीसी टुर्नामेंटमध्ये भारताचा मार्ग रोखलाय. या वनडे वर्ल्ड कपमधील न्यूझीलंड विरुद्धचा सामना टीम इंडियासाठी सर्वात मोठ आव्हान असेल. पण टीम इंडियाला न्यूझीलंडला कसं जाळ्यात अडकवायच त्याचा मंत्र एका टीमकडून मिळाला आहे.

भारताने वनडे वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडवर शेवटचा विजय 2003 मध्ये मिळवला होता. त्यानंतर भारत कधीही वनडे वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड विरुद्ध जिंकू शकलेला नाही. 2019 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडने सेमीफायनलमध्ये टीम इंडियाला पराभूत केलं होतं. भारत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021 च्या फायनलमध्ये न्यूझीलंडकडूनच हरला होता. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ टीम इंडियासाठी सर्वात मोठे डोकेदुखी आहे.

न्यूझीलंडच्या फलंदाजांना चांगलच जखडून ठेवलं

अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये 18 ऑक्टोबरला चेन्नईमध्ये सामना झाला. या मॅचमध्ये न्यूझीलंडने 149 धावांनी विजय मिळवला. पण या मॅचमध्ये अफगाणिस्तानच्या स्पिन बॉलर्सनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना चांगलच जखडून ठेवलं होतं. न्यूझीलंडच्या टीमने 288 धावा केल्या होत्या. मुजीब उर रहमान, मोहम्मद नबी आणि राशिद खानची गोलंदाजी खेळताना न्यूझीलंडचे फलंदाज सहज वाटले नाहीत. या तिघांनी टाकलेल्या 28 ओव्हरमध्ये न्यूझीलंडच्या टीमने 141 धावा केल्या. दोन विकेट गमावल्या. टीम इंडियाचे हे दोन प्लेयर न्यूझीलंडवर पडणार भारी

भारताकडे चांगले स्पिनर आहेत. चायनामन गोलंदाजी करणारा कुलदीप यादव चांगल्या फॉर्ममध्ये आहे. रवींद्र जाडेजा सुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये दिसतोय. हे दोघे न्यूझीलंडची स्पिन गोलंदाजी खेळण्याची जी कमतरता आहे, त्याचा फायदा उचलू शकतात. हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेच्या धरमशाळा येथील स्टेडियमवर ही मॅच होत आहे. ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल मानली जाते. पण कुलदीप आणि जाडेजाजी जोडी घातक ठरु शकते. दोघे डावखुरे फिरकी गोलंदाज आहेत. जाडेजाकडे अनुभव आहे. या विकेटवर कशी गोलंदाजी करायची? हे त्याला ठाऊक आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?