Team india : दक्षिण आफ्रीका दौऱ्यात या युवा खेळाडुंना संधी मिळणार, तर यांना बाहेरचा रस्ता

भारतीय टीमच्या या दिर्घकालीन दौऱ्यात भारताच्या दोन युवा खेडुंना संधी मिळण्याची शक्याता आहे. त्यात पहिले नाव आघाडीवर आहे, ऋतुराज गायकवाडचे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना ऋतुराज गायकवाडची कामगिरी अत्यंत चमकदार राहिली आहे.

Team india : दक्षिण आफ्रीका दौऱ्यात या युवा खेळाडुंना संधी मिळणार, तर यांना बाहेरचा रस्ता
यंदाच्या विश्वचषकात भारतीय क्रिकेट टीम सुरुवातीचे दोन्ही सामने पराभूत झाली. त्यानंतर बुधवारी अफगाणिस्तानला नमवत भारताने विजयाचं खातं खोललं. या सामन्यात भारताचे सलामीवीरी केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी तुफान खेळी केली. राहुलने 69 आणि रोहितने 74 धावा करत 13 वर्षांपूर्वीचं अर्थात 2007 च्या विश्वचषकातील एक रेकॉर्ड तोडला.
| Edited By: | Updated on: Dec 12, 2021 | 4:28 PM

टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात दुवा युवा खेळाडुंना संधी मिळणे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र शिखर धवनचे काय होणार? याबाबत अजून निश्चितता नाही. शिखरची खराब कामगिरी टीम इंडियासाठी चिंतेचा विषय होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून शिखरची कामगिरी सुमार राहिली आहे.

ऋतुराज गायकवाड, व्यंकटेश अय्यरला संधी मिळणार

भारतीय टीमच्या या दिर्घकालीन दौऱ्यात भारताच्या दोन युवा खेडुंना संधी मिळण्याची शक्याता आहे. त्यात पहिले नाव आघाडीवर आहे, ऋतुराज गायकवाडचे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना ऋतुराज गायकवाडची कामगिरी अत्यंत चमकदार राहिली आहे. त्याने ओपनिंग करत धावांचा रतीब घातला आहे. त्यामुळे त्याचे नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. तर भारताचा दुसरा युवा खेळाडू व्यंकटेश अय्यरलाही संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यंकटेश अय्यरचीही आयपीएल आणि इतर स्पर्धेतील कामगिरी चांगली आहे. त्यामुळे त्यालाही संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे.

व्यंकटेश अय्यर हार्दीक पांड्याची जागा घेणार?
विजय हजारे ट्रॉफीत व्यंकटेश अय्यरने अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्याने बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही चांगली केली आहे. त्यामुळे त्यालाच आता प्रमुख ऑल राऊंडर मानले जात आहे. त्यामुळे तो आता टीममध्ये हार्दीक पांड्याची जागा घेणार का? हेही पाणे म्हत्वाचं ठरणार आहे. हार्दीक पांड्याची कामगिरी टी-20 विश्वचषकातही खराब राहिली आहे. त्यामुळे त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्याची शक्यता आहे. त्याच्या ठिकाणी या युवा खेळाडूवर विश्वास दाखवला जाऊ शकतो. श्रेय्यस अय्यरला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे आणि संधी मिळाल्यास त्याला पाचव्या स्थानी फलंदाजी करावी लागणार आहे. कारण केएल राहुल, रोहित शर्मा दोघे ओपनिंगला खेळतात, तीन नंबरला विराट कोहली असणार तर नंबर चारला विकेटकिपर ऋषभ पंतला संधी मिळणार आहे.

Nagpur Agrovision | शेती करा इस्त्राइलसारखी, केंद्रीय मंत्री गडकरींचं आवाहन

Rohit sharma : रोहित शर्माबाबत सौरव गांगुली यांचं मोठे वक्तव्य, रोहितबद्दल गांगुली म्हणतात…

VIDEO: तेरे संग यारा… टांझानियाच्या तरुणाचे आणखी एक गाणे हीट! लाजवाब लिपसिंक, नेटकरी म्हणाले awesome!