Rohit sharma : रोहित शर्माबाबत सौरव गांगुली यांचं मोठे वक्तव्य, रोहितबद्दल गांगुली म्हणतात…

Rohit sharma : रोहित शर्माबाबत सौरव गांगुली यांचं मोठे वक्तव्य, रोहितबद्दल गांगुली म्हणतात...
सौरव गांगुली

गांगुली यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, रोहित शर्माचा टीमसाठी चांगला रस्ता निवडेल अशी आशा आहे. आयपीएलमध्ये त्याची कामगिरी अत्यंत चांगली रोहिली आहे. त्याने पाचवेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. त्यामुळे त्याच्यावर निवडसमितीने विश्वास दाखवला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Dec 12, 2021 | 4:03 PM

मुंबई : भारताचा पूर्व कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी रोहित शर्माबद्दल मोठं वक्तव्य केले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीमला चांगले यश मिळेल असा विश्वास सौरव गांगुली यांनी व्यक्त केला आहे. भारताच्या टी-20 आणि वनडे टीमचा कर्णधार रोहित शर्मा झाल्यापासून अनेक चर्चा सुरू आहेत. त्यावर गांगुली यांनीही आपले मत व्यक्त केले आहे. त्यात रोहितचे खूप कौतुक केले आहे.

रोहित चांगले नेतृत्व करेल

गांगुली यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, रोहित शर्माचा टीमसाठी चांगला रस्ता निवडेल अशी आशा आहे. आयपीएलमध्ये त्याची कामगिरी अत्यंत चांगली रोहिली आहे. त्याने पाचवेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. त्यामुळे त्याच्यावर निवडसमितीने विश्वास दाखवला आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या आशिया कप स्पर्धेत रोहित शर्माने टीमचे नेतृत्व चांगले केले आहे. त्या स्पर्धेत विराट कोहली खेळत नसताना त्याने भारताला विजेतेपद जिंकून दिले आहे. विराट कोहली नसताना आशिया कप जिंकून देणे कठिण होते, मात्र त्याने ती कामगिरी करून दाखवली आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वात निश्चितच टीम चांगली कामगिरी करेल. असेही गांगुली म्हणाले आहेत.

एका टीमध्ये जास्त कर्णधार असणे चांगले नाही

टी-20 आणि वनडेत एकच कर्णधार का असावा? यावरही गांगुली यांनी भाष्य केले आहे. एका टीममध्ये जास्त जणांकडे नेतृत्व असणे चांगली गोष्ट नाही. विराट कोहलीने टी-20 संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर नवा कर्णधार निवडणे गरजेचे होते. विराट कोहलीबद्दल बोलताना गांगुली म्हणाले, विरोट कोहली एक महान क्रिकेटर आहे, त्याची जिद्द कमालीची आहे. त्याचा टीमला निश्चितच फायदा होतो. त्याला जास्त ताण येऊ नये. मीही खूप काळ कर्णधार होतो, कामाचा किती लोड असतो मला माहीत आहे, असेही ते म्हणाले.

Students Attack | दहावीच्या चौघा विद्यार्थ्यांवर शाळेबाहेर चाकूहल्ला, अल्पवयीन टोळकं पसार

Flowers Exhibition | नागपुरात रंगीबेरंगी फुलांची बाग फुलली!

Obc reservation : कसं काय पाटील…वक्तव्यावाचून भुजबळांना गत्यंतर नाही, ओबीसी आरक्षणावरून दरेकरांचा हल्लाबोल

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें