Students Attack | दहावीच्या चौघा विद्यार्थ्यांवर शाळेबाहेर चाकूहल्ला, अल्पवयीन टोळकं पसार

Students Attack | दहावीच्या चौघा विद्यार्थ्यांवर शाळेबाहेर चाकूहल्ला, अल्पवयीन टोळकं पसार
मिठाईच्या दुकानातील उकळत्या पाण्यात पडली चिमुकली

परीक्षा देऊन आलेले विद्यार्थी जसे शाळेबाहेर पडले, तसा विरोधी गटातील मुलांनी त्यांच्यावर हल्लाबोल चढवला. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. विद्यार्थी सैरावैरा पळत सुटले. मात्र आरोपींनी लाठ्या-काठ्या आणि चाकूंसह त्यांचा पाठलाग केला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Dec 12, 2021 | 3:54 PM

नवी दिल्ली : शाळेबाहेर विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राजधानी दिल्लीतील मयुर विहार फेज 2 मधील सर्वोदय बाल विद्यालयाच्या बाहेर शनिवारी दुपारी हा प्रकार घडला. दहावीची परीक्षा देऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठी-काठी आणि चाकूने हल्ला केला होता. त्यानंतर आरोपी फरार झाले. पोलिसांनी जखमी विद्यार्थ्यांना लाल बहादूर शास्त्री रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर आहे. आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण?

विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये वादावादी सुरु होती. एका गटातील विद्यार्थी शनिवारी दहावीची परीक्षा देण्यासाठी मयुर विहार फेस-2 मधील शाळेत आले होते. ही मुलं 15 ते 16 वर्ष वयोगटातील आहेत. इंग्रजी विषयाचा पेपर दिल्यानंतर दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास विद्यार्थी शाळेतून बाहेर पडली.

विद्यार्थी शाळेबाहेर पडताच हल्लाबोल

विरोधी गटातील मुलं सापळा रचून बसली होती. त्यामुळे परीक्षा देऊन आलेले विद्यार्थी जसे शाळेबाहेर पडले, तसा विरोधी गटातील मुलांनी त्यांच्यावर हल्लाबोल चढवला. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. विद्यार्थी सैरावैरा पळत सुटले. मात्र आरोपींनी लाठ्या-काठ्या आणि चाकूंसह त्यांचा पाठलाग केला.

जखमी विद्यार्थ्यांवर उपचार

शाळेजवळच्या एका मैदानात आरोपींनी विद्यार्थ्यांना गाठलं. त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले. शाळा प्रशासन आणि परिसरातील नागरिकांनी तातडीने पोलिसांना फोन केला. तर जखमी विद्यार्थ्यांना लाल बहादूर शास्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपींची ओळख पटली असून सगळे अल्पवयीन असल्याचं पोलिसांनी सांगितलं. अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलं नसून पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासत आहेत.

संबंधित बातम्या :

सूडभावनेने महिलेवर गँगरेप, घराला कुलूप लावून तिघे पसार, दार उघडणाऱ्या पोलिसांना दिसलं भयावह दृश्य

पळून लग्न करायला जाताना बाईक अपघात, प्रेयसीचा जागीच मृत्यू, प्रियकर गंभीर

मुलगी झाल्याने बायकोला माहेरी पाठवलं, पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचीही धमकी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें