Obc reservation : कसं काय पाटील…वक्तव्यावाचून भुजबळांना गत्यंतर नाही, ओबीसी आरक्षणावरून दरेकरांचा हल्लाबोल

Obc reservation : कसं काय पाटील...वक्तव्यावाचून भुजबळांना गत्यंतर नाही, ओबीसी आरक्षणावरून दरेकरांचा हल्लाबोल
PRAVIN DAREKAR

ज्यांच्या जीवावर नेतृत्व केलं राजकारण केलं पदवी मिळवली, त्या ओबीसींसाठी काही आपण करू शकत नाही, या हतबलतेने छगन भुजबळांचे अशाप्रकारे उद्गार आलेले आहेत. अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Dec 12, 2021 | 3:26 PM

कसं काय पाटील… अशाप्रकारचे विधान करण्यावाचून छगन भुजबळ यांना गत्यंतर नाही. कारण ज्यांच्या जीवावर नेतृत्व केलं राजकारण केलं पदवी मिळवली, त्या ओबीसींसाठी काही आपण करू शकत नाही, या हतबलतेने छगन भुजबळांचे अशाप्रकारे उद्गार आलेले आहेत. अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. कोर्टाने या सरकारला अनेकदा रिमाइंडर दिला, प्रक्रिया पूर्ण करा आणि त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्याने कोर्टाला निर्णय घ्यावा लागला, केवळ दिखावा करण्याचं काम ओबीसींच्यासाठी अध्यादेश काढून करण्यात आलं, असंही दरेकर म्हणाले आहेत.

सरकारची मानसिकता बरोबर नाही

सरकारची मानसिकता ओबीसींबाबत बरोबर नाही. देशाचे पंतप्रधान ओबीसी समाजाचे आहेत , ओबीसींच्यासाठी भारतीय जनता पार्टी एकमेव पक्ष म्हणून रस्त्यावर उतरला आंदोलनं केली आणि समाजाला न्याय देण्याचे कामही भाजप करेल असेही दरेकर म्हणाले आहेत. गोपीनाथ मुंडे साहेबांचे नाव सांगून आपल्या संस्कृतीपासून दूर पळण्याचा प्रयत्न करू नका. आत्ता त्यांच्याशी एकत्रितपणे समान किमान कार्यक्रम अंगलट येतोय. अशी टीका महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

मुस्लिम आरक्षणाला लगेच पाठिंबा का दिला नाही?

नवाब मलिक यांनी सभागृहात मुस्लिम आरक्षण जाहीर केलं पण लगेचच उद्धवजी ठाकरे यांनी त्याला समर्थन दिलं नाही. ओवेसी त्याठिकाणी भूमिका घेतात याचा अर्थ महाविकास आघाडीत नेमकं काय चाललंय ते समजतंय. मला वाटत सत्यता पडताळून वस्तुस्थितीची आढावा घेऊन त्या ठिकाणी निर्णय घेणे अपेक्षित आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी मुस्लिम आरक्षणावर त्यांनी दिली आहे. मला वाटतं तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे कर अशी महाविकास आघाडीची गत झाली आहे. कोणत्याही गोष्टीचे खापर भाजपवर फोडायचे, अशी सडकून टीका दरेकरांनी केली आहे.

विरोधी पक्षांचे नेतृत्व कुणाकडे?

त्याचबरोबर दरेकरांनी शरद पवारांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत. संजय राऊत यांनी जाहीर करावं की सोनिया गांधी या विरोधी पक्षाला पर्याय असतील, की ममता बॅनर्जी पर्याय असतील की पवार साहेब असतील, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. एका बाजूला ममतांना आणायचं आणि त्या गेल्यावर काँग्रेस नाराज झाला म्हणून दिल्लीला जाऊन पाय पकडायचे, मग आता नेतृत्व करणार कोण? असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे. मोदींवर या देशातील जनतेचा प्रचंड विश्वास आहे, म्हणून आम्ही ३०० पार गेलो, आणखी दहा-पंधरा वर्षे तरी मोदींच्या नेतृत्वात सरकार चालेल, असा विश्वास दरेकरांनी व्यक्त केला आहे.

MHADA exams | ‘पेपर फुटीची शंका आल्याने सायबर पोलिसांना दिली होती कल्पना’… ; शास्त्री रोडवर मोठा पोलीस बंदोबस्त

लग्नावरुन परतणाऱ्या सरपंच-पोलिसावर अंदाधुंद गोळीबार, दोघांचा जागीच मृत्यू

बँकिंग क्षेत्रातील नव्या धोरणांचा ठेवीदारांना फायदा; अनेक वर्षांपासून अडकलेले पैसे मिळाले परत, मोदींची बँक ठेवी विमा कार्यक्रमात माहिती

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें