लग्नावरुन परतणाऱ्या सरपंच-पोलिसावर अंदाधुंद गोळीबार, दोघांचा जागीच मृत्यू

लग्नावरुन परतणाऱ्या सरपंच-पोलिसावर अंदाधुंद गोळीबार, दोघांचा जागीच मृत्यू
राजधानी दिल्ली पुन्हा हादरली; एकाच रात्री 2 कॅबचालकांची हत्या

दोघं जण एका लग्न समारंभासाठी गेले होते, तिथे गुन्हेगार बराच वेळ कम्युनिटी हॉलच्या बाहेर दोघांची वाट पाहत होते. दोघे जण बाहेर येताच त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Dec 12, 2021 | 3:15 PM

पाटणा : बिहारमध्ये गुन्हेगारांनी पुन्हा एकदा पोलिसांना खुले आव्हान देत दुहेरी हत्याकांड (Patna Double Murder) घडवून आणले आहे. पाटणा लगतच्या बाढ भागात शनिवारी रात्री उशिरा आरोपींनी सरपंच आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची गोळ्या घालून हत्या केली. आरोपींना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

काय आहे प्रकरण?

ही घटना बिहार राज्यातील पाटणाजवळील बाढ पोलीस ठाण्याच्या बाजीदपूर रोडवरील भवानी चौकाजवळ घडली. लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या सरपंच आणि पोलीस जमादार यांच्यासह तिघांवर आरोपींरांनी गोळीबार केला. गोळीबार करत गुन्हेगार सहजपणे घटनास्थळावरुन निघून गेले.

घटनेची माहिती मिळताच, बाढ पोलिसांनी तातडीने दोघा जणांना उपविभागीय रुग्णालयात उपचारासाठी नेले, तिथून त्यांना पाटणा येथे रेफर करण्यात आले. सरपंच आणि पोलिस कर्मचाऱ्या पाटण्याला जाताना मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

लग्नावरुन परतताना अंदाधुंद गोळीबार 

दोघं जण एका लग्न समारंभासाठी गेले होते, तिथे गुन्हेगार बराच वेळ कम्युनिटी हॉलच्या बाहेर दोघांची वाट पाहत होते. दोघे जण बाहेर येताच त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला.

मयत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश कुमार पंडारक ठाण्यात तैनात होता. तर प्रिय रंजन उर्फ गोरे लाल हे पंडारक पूर्व भागातून 26 नोव्हेंबरला सरपंचपदी निवडून आले होते. पोलीस घटनास्थळाचा सीसीटीव्ही फूटेज शोधत असून आरोपींना पकडण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

संबंधित बातम्या :

‘संसार रिक्षेची चाके थांबली, आत्महत्येशिवाय पर्याय नाही’, एकाच कुटुंबातील चौघांचे विषप्राशन

गुप्तधनाचे अमिष,10 लाख उकळले, पैसे परत मागितले तर म्हणे कोंबडा बनवतो, भोंदूला अटक!

पळून लग्न करायला जाताना बाईक अपघात, प्रेयसीचा जागीच मृत्यू, प्रियकर गंभीर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें