‘संसार रिक्षेची चाके थांबली, आत्महत्येशिवाय पर्याय नाही’, एकाच कुटुंबातील चौघांचे विषप्राशन

'संसार रिक्षेची चाके थांबली, आत्महत्येशिवाय पर्याय नाही', एकाच कुटुंबातील चौघांचे विषप्राशन
'मोक्ष' प्राप्तीचा येडा नाद, लेकरं बाळं, बायको जीवानीशी बाद, एकाच घरात 5 मृतदेह

आई-वडील, मुलगा आणि मुलीने उंदीर मारण्याचे विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे उघडकीस आला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Dec 12, 2021 | 11:23 AM

भुसावळ : एकाच कुटुंबातील चौघा जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये उघडकीस आली आहे. कोरोना काळात-घरात अन्नाचा कण नाही, त्यामुळे जगून काय करणार? आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असं म्हणत चौघा जणांनी जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला.

काय आहे प्रकरण?

‘संसार रिक्षेची चाके चालवणाऱ्या कोरोना काळात थांबली. यामुळे आर्थिक विवंचनेसह मुलांची चिंता लागली. घरात अन्नाचा कण नाही. यामुळे जगून काय करणार? आत्महत्येशिवाय पर्याय नाही ‘ अशी तोडक्यामोडक्या भाषेत चिठ्ठी लिहून प्रेरणा नगरात राहणाऱ्या कुटुंबाने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला.

चौघांचे विषप्राशन, उपचार सुरु

आई-वडील, मुलगा आणि मुलीने उंदीर मारण्याचे विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे उघडकीस आला. या चौघांवर डॉ. उल्हास पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

संबंधित बातम्या :

मंडप डेकोरेशनचे पैसे मागितले म्हणून एकाला बेदम मारहाण; एकाला अटक तर दोघे फरार

आधी सामूहिक बलात्कार, मग पीडितेला दोन लाखांना विकले; राजस्थानमधील धक्कादायक प्रकार

 प्रेयसीशी जबरदस्तीचा प्रयत्न; नकार देताच गळफास लावला पण…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें