Kalyan Crime : मंडप डेकोरेशनचे पैसे मागितले म्हणून एकाला बेदम मारहाण; एकाला अटक तर दोघे फरार

Kalyan Crime : मंडप डेकोरेशनचे पैसे मागितले म्हणून एकाला बेदम मारहाण; एकाला अटक तर दोघे फरार
मंडप डेकोरेशनचे पैसे मागितले म्हणून एकाला बेदम मारहाण

आधी शेखर आणि सागरने सचिनला बुक्क्याने मारहाण केली. त्यानंतर संदीप याने लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात सचिन कांबळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना कल्याणच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कल्याणच्या कोळसेवाडी पोलिासांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करीत सागर उर्फ चिंटू पावशे याला प्रथम ताब्यात घेतले आहे.

अमजद खान

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Dec 11, 2021 | 10:06 PM

कल्याण : मंडप डेकोरेशनचे बाकी असलेले पैसे मागायला गेलेल्या मंडप चालकाला तीन जणांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करीत एकाला ताब्यात घेतले आहे. तर दोन जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

कल्याण पूर्व भागातील काटेमानिवली परिसरात साईबाबा नगरात राहणारे सचिन कांबळे यांचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे. या कामावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. काही दिवसापूर्वी त्यांनी एका ठिकाणी मंडप टाकण्याचे काम केले होते. या कामासाठी ठरलेल्या पैशापैकी 12 हजार रुपये सदर व्यक्तीकडे बाकी होते. काही दिवसांपासून सचिन कांबळे हे त्याच्या मागे पैशासाठी तगादा लावत होते.

पैसे मागायला घरी आल्याच्या रागातून मारहाण

अखेर कामाचे पैसे मागण्यासाठी कांबळे हे संबंधित व्यक्ती राहत असलेल्या कल्याण पूर्व भागातील काटेमानिवली परिसरातील शिवम इमारतीत गेले. त्यांनी 12 हजार रुपयांची मागणी केली. पैसे मागण्यासाठी घरापर्यंत आल्याचा त्या व्यक्तीला राग आला. हाच राग मनात ठेवून संदीप हनुमान पावशे, शेखर हनुमान पावशे, सागर उर्फ चिंटू हनुमान पावशे या तिघांनी मिळून सचिनला मारहाण केली.

जखमी सचिन कांबळेवर रुग्णालयात उपचार सुरु

आधी शेखर आणि सागरने सचिनला बुक्क्याने मारहाण केली. त्यानंतर संदीप याने लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात सचिन कांबळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना कल्याणच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कल्याणच्या कोळसेवाडी पोलिासांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करीत सागर उर्फ चिंटू पावशे याला प्रथम ताब्यात घेतले आहे. अन्य दोन जणांचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र एक तर मंडपाचे काम करुन घेतले. एका गरीब व्यक्तिच्या कामाचे पैसे न देता त्याला मारहाण केल्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Beating the decoration owner for asking for money for pavilion decoration)

इतर बातम्या 

Rajasthan Crime: आधी सामूहिक बलात्कार, मग पीडितेला दोन लाखांना विकले; राजस्थानमधील धक्कादायक प्रकार

Love breakup | प्रेयसीशी जबरदस्तीचा प्रयत्न; नकार देताच गळफास लावला पण…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें