AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

न्यूझिलंड विरोधात मालिका गमावली; नाराज BCCI चा कॅप्टन रोहित शर्माला मोठा धक्का, ऑस्ट्रेलिया विरोधातील मालिकेपूर्वी मोठा निर्णय

सध्या टीम इंडिया आणि न्यूझिलंडमध्ये तिसरा कसोटी सामना सुरू आहे. यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होणार आहे.

न्यूझिलंड विरोधात मालिका गमावली; नाराज BCCI चा कॅप्टन रोहित शर्माला मोठा धक्का, ऑस्ट्रेलिया विरोधातील मालिकेपूर्वी मोठा निर्णय
| Updated on: Nov 01, 2024 | 3:47 PM
Share

भारतानं न्यूझिलंड विरोधातील कसोटी मालिका गमावली आहे. न्यूझिलंडविरोधात तीन कसोटी मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाचा दोन समान्यात यापूर्वीच पराभव झाला आहे. सध्या टीम इंडिया आणि न्यूझिलंडमध्ये तिसरा कसोटी सामना सुरू आहे. यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. न्यूझिलंडविरोधातील तिसरा कसोटी सामना संपल्यानंतर पाच नोव्हेंबरनंतर टीम इंडिया कधीही बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होवू शकते. मात्र त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे ऑस्ट्रोलिया दौऱ्यामधील टीम इंडियाचा एक सामना रद्द झाला आहे.

22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या पाच कसोटी सामन्याच्या या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी भारतीय टीम इंडिया एच्या विरोधात एक वॉर्म अप मॅच खेळणार होती. हा सामना बीसीसीआयनं रद्द केला आहे. इंडिया ए च्या विरोधात 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान होणारा वॉर्म अप सामना देखील पर्थच्याच मैदानात होणार आहे. जिथे भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघानं जोरदार तयारी केली आहे.बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाकडून आपसात खेळण्याचा प्लॅन बनवण्यात आला होता. मात्र टीम इंडियानं न्यूझिलंडविरोधात कसोटी मालिका गमावली आहे, सलग दोन सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला. या खराब कामगिरीमुळे बीसीसीआय नाराज असून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी होणारी वॉर्मअप मॅच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.वॉर्म मॅचऐवजी आता खेळाडू नेट प्रॅक्टिसवर भर देणार आहेत.

दरम्यान भारतीय संघानं यापूर्वी आपल्या दोन दौऱ्यांमध्ये वॉर्म अप मॅच खेळली होती. 2018-19 च्या दौऱ्यामध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलिया XI विरोधात चार दिवसांची वॉर्म अप मॅच खेळली आहे. तर 2020-21 मध्ये देखील वार्म अप सामना खेळवण्यात आला होता. मात्र यावेळी तो रद्द करण्यात आला आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा