
संधीचं सोनं करणं काय असतं? हे टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आकाश दीप याने सिद्ध करुन दाखवलं. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला इंग्लंड दौऱ्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यातून (2-6 जुलै) वर्कलोड मॅनेजमेंटमुळे विश्रांती देण्यात आली. त्यामुळे बुमराहच्या जागी बिहारचा असलेल्या आकाश दीप याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली. आकाशने या सामन्यातील दोन्ही डावात एकूण 10 विकेट्स घेतल्या. आकाशने 10 विकेट्स घेण्यासह टीम इंडियाला बर्मिंगॅहममध्ये कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिलावहिला विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. भारताने हा सामना तब्बल 336 धावांच्या फरकाने जिंकला. आकाशच्या या यशामागे त्याची कठोर मेहनत, अभ्यास, कौटुंबिक संघर्ष अशा अनेक गोष्टी आहेत. आकाशला घरातूनच क्रिकेटसाठी विरोध होता. मात्र आकाशने टेनिस क्रिकेटपासून सुरुवात केली आणि त्याने लेदर बॉलपर्यंतच्या प्रवासाला गवसणी घातली. आकाशला या दरम्यान अनेक चढ-उतारांचा ‘सामना’ करावा लागला. आकाशने वैयक्तिक आयुष्यात अनेक कसोटींवर मात केली....